WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’मध्ये

Image

यवतमाळ : केंद्र शासनाच्या दप्तरी कोरोना बाधित १५ रुग्णांची नोंद असल्याने यवतमाळ जिल्ह्याची गणना ‘रेड झोन’मध्ये करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी गुरुवारी ही बाब स्पष्ट केली.

जिल्हाधिकारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, सध्यास्थितीत यवतमाळात कोरोना बाधित दहा रुग्ण आहे. परंतु यापूर्वी एकूण पाच रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह येऊन नंतर बरे होऊन घरी गेले. त्यातील तीन यवतमाळात तर प्रत्येकी एक पुणे व मुंबईत बरा झाला. अशा एकूण १५ रुग्णांची नोंद केंद्र शासनाकडे असल्याने यवतमाळ जिल्ह्याचा समावेश ‘रेड झोन’मध्ये करण्यात आला आहे. यवतमाळात सध्या कोरोना बाधित म्हणून उपचारार्थ दाखल असलेल्या सात ते आठ रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. पुढील तीन-चार दिवसात ते पॉझिटीव्हच्या परिघाबाहेर निघण्याची शक्यता आरोग्य प्रशासनाने वर्तविली आहे.

सोमवारपासून एपीएमसी उघडणार

यवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’मध्ये असला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता शेतीविषयक कोणतीही कामे प्रलंबित राहू नये या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार २० एप्रिलपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना शेतमाल खरेदीची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून बाजार समित्या सुरू होणार असल्याने शेतकºयांवरील ताण बºयापैकी कमी होण्यास मदत होणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share