WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

DAYNULM नगर परिषद वणी अंतर्गत मास्क पुरवठा.

Image

वणी लोकेश गुंडलवार
सध्या जगभरात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुभाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून या जीव घेण्या आजाराच्या विषाणू पासून बचाव करण्या करता व देश हिताच्या कार्याला हातभार लावण्याच्या उद्देशाने
प्रेरणा वस्ती स्तर संघ अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून मास्क निर्मिती करण्यात येत असून सादर ALF च्या माध्यमातून 3000 मास्क तयार करून नगर परिषद वणी, ग्रामीण रुग्णालय वणी, तालुका आरोग्य अधिकारी वणी, तालुका आरोग्य अधिकारी मारेगाव, एल. आई. सी. कार्यालय वणी व इतर सेवाभावी संस्थेला पुरवठा करण्यात आला . या माध्यमातून
कोवीड 19 या पासून बचाव करण्यासाठी हा उपक्रम करत आहे या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना एक रोजगार उपलब्ध झाला आणि आपला उदरनिर्वाह करण्यात मदत होत आहे या मध्ये प्रेरणा वस्ती स्तर संघ ला एकविरा बचत गट, गुरुवर्य बचत गट, ज्ञानेश्वरी बचत गट, शांती बचत गट, सावित्री बचत गट यांचा सहभाग आहे. यामध्ये प्रामुख्याने सौं वणीता खंडाळकर, सौं सोनाली तिवारी, सौं रीना पारधी, सौं संगीता झाडें, व इतर महिलांना श्रम घेतले व यांना daynulm विभागातील शहर अभियान व्यवस्थापक ऍड पूर्णिमा शीरभाते, श्री उत्तम हापसे, समूह संघटक श्री विनोद मनावर यांनी मार्गदर्शन केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share