WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोबाईल चोरी प्रकरणात, किराणा दुकान फोडणा-या 'त्या' चोरट्यांना वणी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Image

लोकडाउन मध्ये रिमांडवर सोडण्यात आलेल्या आरोपितांमुळे पोलीसांची डोखेदु:खी वाढणार!

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

मोबाईल चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांनी गोकुल नगर मधिल किराणा दुकान फोटल्याचे कबुल केले आहे. परिणामी दोन्ही चोरीच्या प्रकरणातील ओरोपीतांना वणी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे.

फिर्यादी मोहम्मद इमरान मोहम्मद आसिफ(35)रा.सावरकर चौक वणी यांनी दि.16 एप्रिल रोजी पो.स्टे.वणी येथे रिपोर्ट दिला की,दि.14 एप्रिल चे मध्यराञी

त्यांचे राहते घरुन अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल हँडसेट चोरुन नेले.अशा तक्रारीवरुन पो.स्टे.वणी येथे कलम 379 भादंवी अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. तपास सुरु असतांनाच डि.बि.पथकाला गुप्त माहिती मिळाली त्यावरुन आरोपी राजु पुरुषोत्तम पोटे(35)रा.नविन लालगुडा वणी, प्रफुल परशराम शंभरकर(47)रा.खरबडा मोहल्ला वणी या दोघांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरी केलेला एक विवो कंपनीचा तर दुसरा सँमसंग कंपनीचा असे दोन मोबाईल हँडसेट किंमत अंदाजे दहा हजार रुपयेचा माल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपीस दि.16 एप्रिल रोजी अटक केली.अधिक तपास केला असता सदर आरोपितांनी दोन आठवड्यापुर्वि गोकुल नगर वणी येथिल किराणा दुकाण फोडुन चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यांचेकडील गुन्ह्यातील एकुन 4370 रुपयाचा किराणा माल मिळुन आला.सदर माल जप्त केल्यावरुन गुन्हा उघडकीस आणला असुन दोन्ही गुन्ह्यातील एकुन 14,370/- रपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढिल तपास सुरु आहे.

विशेष म्हणजे लाोकडाउन सुरु असल्यामुळे 7 वर्षा आतील सजा भोगत असणारे कैदी रिमांडवर सोडण्यात आले आहेत. यामध्ये वणीतील काही अट्टल चोरटे बाहेर आले असल्यामुळे आता पोलीसांची डोखेदु:खी माञ चांगलीच वाढणार आहे!

सदरची कारवाई मा.सुशिलकुमार नायक पोलीस उपविभागीय अधिकारी वणी, मा.वैभव जाधव पोलीस निरीक्षक वणी, यांचे मार्गदर्शनात डी.बी पथकप्रमुख पोउनि/ गोपाळ जाधव, पोहवा/ सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे ,पंकज उंबरकर,दिपक वांड्रसवार, व पो.काँ अमित पोयाम यांनी केली.


अंगणात खेळणाऱ्या मुलीवर अल्पवयीन मुलाने केला अतिप्रसंग -

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share