WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

"सृजन संस्था मागूर्डा" याच्या मार्फत 'कोडपाखिंडी' या गावात निराधार,परितक्त्या महिलांना जीवन आवश्यक वास्तूचे वाटप.!!"

Image

झरी (जामणी) तालुक्याला लागुण असलेला छोटंसं गाव कोडपाखींडी आहे . आदीवासी बहुल गाव म्हणुन ओळखल्या जाते..भारत सरकारने कोरोणा या विषाणूची वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊन ची घोषणा केली आहे . त्यामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे . हाताला काम नाही तर पैसे नाही,पैसा नाही तर किराणा समान नाही खायच काय? जगायचं कसं अशी गंभीर चिंता त्या महिलांणा जानवत होती . हे माहीत होताच १५ निराधार, पारितक्त्या महीलाणा मदत म्हणुन "सृजन संस्था" ही महिलांना मदत करण्यासाठी धाउन आली.लॉकडाऊन असल्याने निराधार महिला ,परितकत्या महिला यांना कोडापाखिंडी या गावात जाऊन सृजन संस्था ही महीलाची चिंता दूर करण्यासाठी आली आणि त्या महिलांना १० दिवस पुरेल एवढे जीवनुपायोगी सामान ' सोशल डिस्तन्स ' ठेऊन वितरण करण्यात आले. गहू,तादुल, दाळ,टिकत,मीठ,तेला,भाजीपाला ,साखर ई. नाना प्रकारचे जीवन उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.झरि जमानी तालुक्यात आणेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आपआपली जबाबदारी ओळखुन सामाजीक्तेच दाईत्व पार पाडत आहे. "सृजन संस्थेचे" पदाधीकारी,गावातील सामाजीक कार्यकर्ते व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते . श्री. पुरुषोत्तम गेडाम, झरी (जामणी)

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share