WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहीद पोलीस निरीक्षक छत्रपती चिडे यांना वणीत भावपूर्ण श्रद्धांजली

ImageImage

सुरज चाटे वणी-. वणी तालुक्यातील मारेगाव (कोरम्बी) येथील नागभीड पोलिक स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसन चिडे यांनी दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नात त्यांना वीर मरण आले तेव्हा त्यांना दिनांक 9 नोव्हेंबर ला वणीच्या शिवाजी पुतळ्यासमोर आज सकाळी 10 वाजता धनगर समाज बांधवांनी शोक संवेदना देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी विविध पक्षातील तसेच सामाजिक संघटनेच्या पाधादिकारी यांनी भाषणे दिली काहींनी भाजपा सरकारचा निषेधही केला, काहींनी भाजप सरकारला प्रश्न सुद्धा उपस्थित केली. यावेळी मोठ्या प्रमाणात वणीतील दिग्गज नेते मंडळी जमली व शहिद छत्रपती चिडे यांना श्रद्धांजली देण्यात आली,

वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे तसेच शिरपूर येथील ठाणेदार पवार यांनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शोकसंवेदनेचे प्रास्ताविक संतोष सांबरे यांनी केले तर सूत्रसंचालन विकास चिडे यांनी केले त्यानंतर समाज बांधवानी शाहिद छत्रपति चिडे याच्या कुटुंबाला शासनस्तरावर लाभ द्यावा व कुटुंबातील व्यक्तीला नोकरीत सामावून घ्यावे व गुन्हेगारांना शिक्षा देऊन न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यान देण्यात आले तसेच उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार के सी ब्राम्हणवाडे याना दिले यावेळी तालुका अध्यक्ष शंकरराव उरकुडे वसंता गोरे प्रल्हाद चामाटे काशीनाथ पचकटे विलास शेरकि सूर्यभान चिडे मनोज खाडे , नितीन वैध , प्रमोद नवघरे सुरेंद्र इखारे , आशिष ढवळे गौरव उगे ,नितीन चाहनकार विनायक कांदळकर अक्षय झिले अरविंद अवगण विलास बरडे , व मोठ्या संख्येनी समाज बांधव उपस्थित होते यावेळी विविध स्तरावरील गन्मान्य लोक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share