WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कुंभा येथे वणीतील विद्यमान नगरसेवकासह ,मोठा दारु साठा जप्त

Image

सिनेस्टाईल पध्दतीने पाठलाग करुन, गुन्हेगारांना घेतले ताब्यात
वणी शहर प्रतिनिधी:- निलेश अशोकराव चौधरी

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथिल देशी दारु दुकानावर धाड टाकून 24 लाख 45 हजार तिनशे चौपन्न रुपयाचा मुद्देमाल जप्त केला अाहे. हि कारवाई आज दि.18 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली असुन या प्रकरणी वणी येथिल नगर सेवकासह सहा आरोपींना अटक करण्यात आली असुन एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. एसडीपीओ वणी यांच्या मार्फत करण्यात आलेली ही संचारबंदीच्या काळातिल सर्वात मोठी कारवाई ठरत आहे. या कारवाईमुळे माञ अवैद्य व्यवसायीकांचे चांगलेच धाबे दणानले आहे. मारेगाव तालुक्यातील कुंभा या गावात देशी दारुचे दुकान आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना शुक्रवारी रात्री खब-याकडून खबर मिळाली की, कुंभा ग्राम येथील जयस्वाल यांचे देशी दारुचे दुकानातुन वणी येथिल छोटु उर्फ प्रशांत निमकर हा चारचाकी वाहनाने देशी दारु कुंभा- मारेगाव मार्गे वणी येथे वाहतुक करणार आहे. अशा माहिती वरुन शासकिय पंचासह धाड टाकली असता राहुल जयस्वाल हा त्याचे सहकार्यासह देशी दारुचे दुकानात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल केलेले कुलुपावरील सिल तोडुन देशी दारुचे बाक्स त्याचे सहकार्यांच्या वाहनात भरत होता.मान्झा वाहन क्र.एमएच 29 एेडी 2383 हे वाहन पोलीसांची चाहुल लागताच वेगाने पसार झाली.त्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन ग्राम मदनापुर येथे पकडण्यात आले.त्यानंतर सदर देशी दारुच्या दुकानात पाहणी केली असता खोलीतुन व ईतर वाहनातुन छाप्यादरम्यान देशी दारु एकुन किंमत 7 लाख45 हजार 354 रुपये किमतीची व वाहतुकी करिता वापरण्यात आलेले वाहन स्कारपियो वाहन क्र.एमएच 32 सि 9099 किं.अं.7 लाख, स्विप्ट डिझायनर वाहन क्र.एमएच 29 बिसी 1616 किं.अं.6 लाख, इंडिगो मो.वाहन क्र.एमएच 29 एेडी 2383 किं.अं.4 लाख व देशी दारुसह एकुन 24 लाख 45 हजार 354 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी राहुल अरुण जयस्वाल (37)रा.मारेगाव,छोटु उर्फ प्रशांत निमकर(32)रा.तेली फैल वणी, उमेश अरुण बहिरे (22) रा.जैन ले आउट वणी,सागर सुरेश आसमवार(30)रा.भिमनगर वणी, अल्ताफ लतिफ शेख(24)रा.माळीपुरा वणी,राहुल पंढरी कुचनकर(28)रा.तेली फैल वणी,विनोद दादाजी केळकर(33)रा.कुंभा ता.मारेगाव यांना अटक करण्यात आली.तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. सर्व आरोपितांच्या विरुद्ध (कोविड-19) संसर्गजन्य साथिच्या रोगामध्ये मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशानुसार संचारबंदी/दारुबंदी असतांनासुद्धा कट रचुन देशी दारुचे दुकानाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने लावलेले कुलुपाचे सिल तोडुन अवैद्यरित्या दारुचा साठा वाहनात भरुन वाहतुक करतांना मिळुन आले.तरि आरोपींचे क्रुत्य महाराष्ट् दारुबंदी अधिनियम कलम 65(अ)(ई)82,83 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनम 2005 सह कलम 188,269 भादंवि सह कलम 135 मपोका सह नियम कोविड -19 उपाय योजना नियम 2020 नियम 11अन्वये कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक एम राजकुमार,अपर पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, पोनि,जगदिश मंडलवार, पोउनि/अमोल चौधरी, नापोकाँ /विजय वानखेडे,ईक्बाल शेख,प्रदीप ठाकरे,रविन्द्र ईसनकर,आशिष टेकाडे,संतोष कालवेलकर,अतुल पायघन,अशोक दरेकर विजय कुळमेथे,कलीम सफौ ,मनोज बोडलकर यांनी पार पाडली. पुढिल तपास पोउनि/ अमोल चौधरी पो.स्टे मारेगाव करित आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share