WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस साध्या पध्दतिने साजरा होणार

Image

प्रतिनिधी/ प्रशांत चंदनखेडे वणी

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस कोरोना मुळे घोषीत करण्यात आलेल्या लॉकडाउन मुळे धुमधडाक्यात साजरा न करता अगदी साध्या पध्दतिने साजरा करण्याचे निर्देश शासना कडून देण्यात आले आहे.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असुन यावर्षी म्हणजे 1 मे 2020 रोजी या स्थापना दिनला 60 वर्षे पुर्ण होत असल्याने या वर्षी हा उस्तव धुमधडाक्याने साजरा करण्यात येणार होता. परंतू राज्यावर कोरोनाच सावट असल्यामुळे या काळातील सर्वच उस्तव सोहळे अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य दिनाचा हा उस्तवही टाळन्याची वेळ आता शासनावर आली आहे. यासंदर्भात समान्य प्रशासनाच्या वतीने मंत्रालयीन सचिवांसह जिल्हप्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहे. या अनुषंगाने मंत्रालय व जिल्हा मुख्यालयात एकाच वेळी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहन करण्यात येणार असून संस्कृतीक कार्यक्रम व मान्यवरांची भाषणे होणार नसल्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे. पालकमंत्री,जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,जिल्हपरीशद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या व्यतेरीक्त कोणत्याही मन्यवराना आमंत्रित करता येणार नसुन पालकमंत्री उपस्थीत न राहिल्यास जिल्हाधिकार्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

तसेच शाळांमधे केवळ मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व इतर तिन कर्मच्यार्यांच्या उपस्थितीतच ध्वजारोहन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकरी यांनी यावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे आदेशही दिले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share