WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कुंभा येथील देशी दारू दुकानावर पोलिसांची धाड

Image

प्रतिनिधी/ प्रशांत चंदनखेडे वणी

कुंभा येथील देशी दारूच्या दुकानातून अवैधरित्या देशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळतात. पोलिसांनी सापळा रचून सात लाखांच्या देशी दारू सह तीन चार चाकी वाहन असा एकूण चोवीस लाख पंच्चेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य म्हणजे यातील एक आरोपी हा वणीतील नगर सेवक असल्याचे समोर आले आहे. ‘लॉक डाऊन’ काळातली हि सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुंभा येथे जयस्वाल यांचे देशी दारू दुकान असून शुक्रवारच्या मध्यरात्री या दुकानातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळतात, पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी धाड टाकली असता, दारू दुकानातून चारचाकी गाड्या मध्ये काही इसमान कडून दारूच्या पेट्या टाकण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी कर्पिओ (एम.एच.३२ सी ९०९९), डिझायर (एम.एच. २९ बि.सि१६१६) या गाड्यांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी कर्पिओ मध्ये पन्नास दारूच्या पेट्या तर दुसऱ्याही गाडीत माल आढळून आला. यातील तींसरी गाडी टाटा मांझा एम.एच.२९ ए.डी २३८३ घटना स्थळावरून पसार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तिला मदनापुर गावा जवळ पकडण्यात आले. या गाडी मध्ये राहुल अरुण जयस्वाल (वय३७) रा.मारेगाव हा आढळून आला, तर दुसरा इसम गोलु सरकार हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यान मध्ये राहुल जयस्वाल (वय३४) रा. मारेगाव, छोटू उर्फ प्रशांत निमकर (वय ३२) रा. तेली फैल वण,. उमेश अरुण बहिरे (२२) वणी, सागर सुरेश आसामवर (३०) भीमनगर वणी, अल्ताफ लतीफ शेख (३४) माळीपुरा वणी, राहुल पंढरी कुचणकर (२८) तेली फैल वणी, विनोद दादाजी केळकर (३३) रा, कुंभा यांचा समावेश आहे. तर गोलू सरकार उर्फ प्रतिक वडस्कर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या सर्वावर महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम ६५ अ (ई) ८२/८३ सहकलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सह कलम १८८,२६९ भादवी सह कलम १३५ म पो का सहनियम कोविड -१९ उपाय योजना २०२० नियम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपपोलीस निरक्षक अमोल चौधरी, मनोज बोडलकर, विजय वानखेडे, इक्बाल शेख, रवी इसणकर, प्रदीप ठाकरे, संतोष तालवेलवार, आशिष केकाडे, अशोक दरेकर, अतुल पायघन, विजय कुळमेथे यांनी केली. पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share