WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जुगार अड्यावर पोलीसांची धाड, चार आरोपिंना अटक

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

पेट्रोलींग करित असतांना पोलिसांना खबरी कडून खबर मिळाली की, ऐकतानगर मधे एका घरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी शेख अकिल शेक शाहिद यांच्या घरी धाड टाकली असता आरोपी शेख मोहसिन शेख सलाम( 48) रा.एकतानगर , मैनोद्दीन(40) रा.शाञिनगर, शेख जुबेर शेख शमशिर (30)रा एकतानगर. राकेश रामक्रिष्ण बिडकर (32)रा.एकतानगर हे जुगार खेळतांना दिसले. पोलीसांनी यांना रंगेहात पकडले. त्यांचाकडून 2130रूपय नगदी,एक पत्याची कीट असा ऐकुन 2180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी या चार जणांसह ज्या व्यक्तीच्या घरी जुगार सुरू होता त्यालाही अटक करण्यात आली आहे.या सर्वांवर जमावबंदी ,संचारबंदी, आपत्ती व्यवस्थापन, जुगार प्रतिबंध कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम मसुका च्या कलम 4,5 व भादंविच्या कलम 188, 269 आपत्ती व्यवस्थापन कायदा 51(ब)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही एसडिपीओ सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नि वैभव जाधव, डीबी प्रमुख पोउनि गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागाळे, सुधिर पाडे,रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर,दिलीप वांड्रसवार,अमित पोयाम यांनी केली. गुन्ह्याचा पुढिल तपास सुरू आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share