WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनामुळे आप्तेष्टांचे अंतिम दर्शन ही झाले दुरापास्त !

Image

कोरोना या माहामारिचे संक्रमण रोखान्या करिता देशभरात लागु करण्यात आलेल्या संचारबंदिमुळे नातेवाईकांच्या सुखादुखात सहभागी होंयावरही अलगत निर्बंध लागले असल्याच्या काही घटना समोर आल्या असून जवळच्या नात्यातील व्यक्तींनाही आपल्या आप्तस्वकियांच्या अंतिम संस्करालाही मुकावे लागले आहे.

अशाच मन हेलाउन टाकनाऱ्या दोन घटना समोर आल्या आहे. कुऱ्हा (तळनी ) येथील एका भावाला आपल्या बहिणीचे अंतिम दर्शन ही घेता आले नहीं. कुऱ्हा (तळणी) येथील नलिनी चहांदे यांचा विवाह होऊन त्या नागपूर येथे वास्तव्यास आहे. त्यांना एक सग्गा तर पंधरा चुलत भाऊ असून ते कुऱ्हा (तळणी) येथे राहतात .काही दिवसांपूर्वी नलीनीला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले व अशातच त्यांचे ८ एप्रिलला निधन झाले. हि बातमी भावाला कळताच बहिणीच्या अंतिम दर्शनाला जाण्या करीता त्याची तगमग सुरु झाली परंतु भाऊ व त्याच्या आईला आपल्या एकुलत्या एका लेकीच्या अंतिम दर्शनालाही जाण्याची परवानगी या लॉकडाउन मुळे मिळाली नसल्याने भाऊ, आई व आप्तेष्टाना व्हिडिओ कॉलींगच्या माध्यमातूनच नलिनी यांचे दर्शन घेऊन त्यांना अखेरचा निरोप देण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला.

दुसऱ्या घटनेत मुलगा अंतविधीला उपस्थित राहू न शकल्याने पित्याला मुलीनेच मुखाग्नी दिला. कारंजा लाड (वाशीम) येथील कारंजा नगर परिषदेचे शिपाई ज्ञानेश्वर जाधव यांचे १५ एप्रिलला हृद्यविकाराने निधन झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा लॉकडाउनमुळे इंदूर येथून न शकल्याने त्यांची लहान मुलगी रीमा हिनेच त्यांच्या चितेला मुखाग्नी देऊन सोपस्कार पार पाडले.

कोरोनाने नात्यातही दुरावा निर्माण केला असून भावाला बहिणीचे व मुलाला वडिलांचे अंतिम दर्शनही कोसो दूरवरून व्हिडिओ कॉलींगच्या माध्यमातून करावे लागेल असा विचारही कधी देशातील तरी नागरिकांच्या मनात आला नसेल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share