WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निंबाडा जंगलातील कोंबडा बाजारावर शिरपूर पोलिसांची धाड……. 86 हजाराचा मुद्देमाल हस्तगत.....

ImageImage

सुरज चाटे वणी :- वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या निंबाळा जंगलात कोंबडा बाजारावर धाड टाकून शिरपूर पोलीसांनी 86 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र कोंबड बाजार सुरू असलेल्या ठिकाणावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकताच तेथील कोंबड बाजार शौकीन सैरा वैरा पडू लागले, वणी उपविभागात सुरू असलेल्या कोंबडा बाजारावरील ही शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई असून कोंबड बाजार शौकीन यामुळे चांगलेच गोचित सापडले आहे.

वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या निंबाळा जंगल परिसरात कोंबड्यांवर झुंज लावण्याचा बाजार भरत असल्याची माहिती ठाणेदार दिपक पवार यांना मिळाली होती. त्यावरून ठाणेदार दिपक पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक योगेश दंदे, सहायक फौजदार विजय मोडक, योगेश ढाले, प्रकाश मेश्राम, संजय खांडेकर आदींना निंबाळा जंगल परिसरात शोध घेण्यासाठी पाठविले असता, निंबाळा जंगल परिसरात शुक्रवारी दुपारी 12 वाजताचे सुमारास कोंबड्यांची झुंज लावण्याचा बाजार भरला होता. शिरपूर पोलीस पथक बाजार भरत असलेल्या ठिकाणी पोहचताच एकच पळापळ सुरू झाली. यात दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. मात्र झुडपी जंगलाचा फायदा घेत इतर जुगार खेळणारे पळून गेले. या कारवाईत शिरपूर पोलीसांनी 86 हजार, एकशे 40 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत रंगनाथ नगर वणी येथील रमेश परचाके, अमीत चांदेकर यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

या कारवाई मुळे कोंबड बाजार शौकीनांचे चांगलेच धाबे दणाणले असून झुडपी जंगलाचा साथ घेऊन कोंबड बाजार शौकीन आपला शौक पूर्ण करीत कोंबडयाची झुंज लावून त्यावर बक्कड पैसा लुटवित असतात त्यावर अशा प्रकारच्या धाडीने अशा शौकिनाना चाप बसला आहे. शिरपूर पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष ठाणेदार दीपक पवार यांनी आपले खबरी माहिती मिळताच त्या ठिकाणी धाड टाकून 86 हजाराच्या मुद्देमालासह दोघास अटक सुद्धा केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share