WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रमजान महिन्यातील सामूहिक नमाज पठणावर निर्बंध

Image

कोरोनाच्या पर्श्वभुमुमिवर सर्वच उस्तव सोहळे व धार्मिक कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने घरातच साजरे करण्यात आले तसेच मंदिरेही कुलूप बंद करण्यात आली. त्यानुषंगाने २५ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या पवित्र रमजान महिन्यातील सामूहिक नमाज पठणावरही शासनाकडून निर्बंध लावण्यात आले आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दररोज एकत्रित येऊन नमाज पठण करतात. वर्षानुवर्षीची ही परंपरा असून या काळात मुस्लिम बांधव नमाज,तरावीह ,इफ्तारसाठी एकत्र येतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आदेश बजावून सामूहिक नमाज पठण टाळण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत सामूहिक नमाज पठण टाळण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, सामाजिक व राजकीय प्रतिनिधी तथा स्वयंसेवी संस्थांनी याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share