WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अबब,,,, कंञाटदार सभापतीवर भारी...!

Image

*सत्ताधारी जलपुर्ती सभापतींनीच केली कंञाटदाराची तक्रार म्हणे,, कंञाटदार करतेय मनमानी कारभार,*

*कंञाटदारावर 50 हजार रुपये दंड करण्याची केली निवेदनाद्वारे मागणी*

वणी शहर प्रतिनिधी:- *निलेश चौधरी*

वणी नगर पालिकेचे जलपुर्ती सभापती नितीन चहानकर यांनी त्याच विभागाच्या कंञाटदाराची तक्रार मुख्यधिकारी संदिप बोरकर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे या नगर पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता असुन जलपुर्ती सभापती नितीन चहानकर हे सुद्धा भाजपाचेच आहे.

तरी सुद्धा एक कंञाटदार सभापतीसह.

सत्ताधारी भाजपाला भारी पडत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

सद्या कोरोनाचे संकट सर्वत्र सुरु असुन...राज्यात 23 मार्च पासुन लाँकडाउन आहे. परिणामी फक्त जिवनावश्यक व गरजु वस्तुच सुरु आहे.यामध्ये सर्वप्रथम जिवनावश्यक म्हणुन पाणी आहे.पाण्याशिवाय मनुष्य जगुच शकत नाही. असे असुनसुद्धा शहरातील काही भागात अजिबात पाणी पुरवठा होत नाही.याबाबतच्या तक्रारी खुद्द नगर सेवक तसेच नागरीकांद्वारे येत आहेत.याबाबत कंञाटदार यांना विचारणा केली असता ते बेजबाबदार व चुकिचे उत्तरे देतात. ईतकेच नाही तर शहरात मोठ्याप्रमाणात पाईप लाईन लिकेज असुन दुरुस्ति करण्यात येत नाही.परिणामी सदर भागातील नागरीकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लिकेज दुरुस्ति व सुरळीत पाणी पुरवठ न करणारे कंञाटदार यांचेवर 50 हजाराचा दंड आकारुन कपात करावा याबाबतचे निवेदन जलपुर्ती सभापती नितीन चहानकर यांनी मुख्यधिकारी संदिप बोरकर यांना दिले आहे.

विशेष म्हणजे न.प.मधील सत्ताधारी पक्षातील एका सभापतीचा अधिकार चालत नसेल त्यांचे कोनीही एेकत नसेल तर पदावर राहण्याचा काय उपयोग? अशी चर्चा जनतेत सुरु आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share