WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निर्जंतुकीरण यंत्रासाठी नगरपंचायत वांझोटी, मारेगांव शहराची फवारणी लांबली

Image

•प्रशासनाला यंत्राची प्रतिक्षा.....!!

प्रतिनिधी/ सचीन मेश्राम (मारेगाव-यवतमाळ)

दहा हजार लोकवस्तीच्या मारेगाव शहर निर्जंतुक करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापूर्वी फवारणी करण्यात आली. तेव्हापासून शहर फवारणी पासून कोसोदुर असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. परिणामी नगरपंचायत प्रशासनकडे तुर्तास फवारणी यंत्रच नसल्याने नगरपंचायत वांझोटी ठरत आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतांना प्रत्येक गांव निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्याचा शासनाच्या आदेशाचे अमंल करणे गरजेचा आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी शहराला फवारणीचा डोस दिल्यानंतर प्रशासानाने ब्रेक दिला आहे. याबाबत मारेगांव शहराला फवारणीचे यंत्रच उपलब्ध नसल्याने शहराला निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन सध्या थंडबसत्यात आहे.

शहराच्या प्रमुख प्रभागात नालीची दुर्गंधी वाढली आहे. अनेक प्रभागाच्या नालीत सडकी दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य बाधित करित आहे. घनकचरा व्यवस्थापनही दुरापास्त झाल्याचे चित्र मारेगांवात आढळून येत आहे. अनेक समस्यांना तोड देणारी जनता मुकाट्याने नाहक त्रास सहन करित असतांना प्रशासनही मात्र दिवस ढकलत आहे. भाडेतत्त्वावर यापुर्वी आणलेली फवारणी यंत्र परत पाठविण्यात आली असून मारेगांव शहर गेल्या पंधरा दिवसापूर्वी पासून फवारणीसाठी हुलकावण्या मारत आहे. यंत्रच नसल्याने सध्यास्थितीत नगरपंचायत निर्जंतुकीकरण करण्यासाठी अपयशी ठरत असतांना यंत्रच्या प्रतिक्षेत हे प्रशासन किती दिवस घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

पण मात्र, येत्या दिवसात फवारणीचे यंत्र येणार असल्याचे समजते. दोन दिवसानंतर मारेगांवात फवारणी करण्याचा विडा

प्रशासन उचलणार आहे असे मुख्यधिकारी निलेश गायकवाड यांनी स्पष्ट केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share