WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वर्धा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; कोणतेही नुकसान नाही

Image

वर्धा जिल्ह्यातील काही भागात बुधवारी दुपारी सौम्य प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले. २.६ रिश्टर स्केल इतक्या कमी तीव्रतेचा हा भूकंप असल्याने यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. दुपारी ३ वाजून १६ मिनिटांनी मोर्शी येथील भूकंपमापक यंत्रावर याची नोंद झाली.

धक्के जाणवलेल्या गावांत हिंगणघाट तालुक्यातील कानगाव, मोझरी शेकापूर, डवलापुर, भय्यापुर, खानगाव, साती, रोहनखेड, कोसूर्ला, वरुड, नांदगाव, कात्री, चानकी, देवळी तालुक्यातील अंबोडा, पाथरी आदी १४ गावांचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी दिली. अचानक दुपारी धक्के जाणवल्याने लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली.

कानगावात घरातील भांडी जमिनीवर पडली तसेच जमीन काही वेळ थरथरली असल्याचे गावच्या तलाठ्यांनी सांगितले. मात्र, यामध्ये कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झालेली नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share