WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोलगांवकरांना विस वर्षापासून नाल्यावरिल पुलाची प्रतिक्षा

Image

कोलगांव ते मारेगांव हा तीन कि. मी. चा रस्ता असून तालुक्याच्या ठिकाणी येण्या साठी वेगांव, डोंगरगांव, कोलगांव येथील नागरिकांना जवळचा मार्ग असल्याने या मार्गाने वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, मात्र कोलगांव येथील नाल्यावर पुल नसल्याने पावसाळ्यात वाहतुक करण्यास प्रवाश्याना त्रास होतो या परिसरातील जनतेनी संबंधीत विभाग व लोकप्रतिनिधी कडे वारंवार मागणी करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने नागरिक लॉकडाऊन नंतर लोकप्रतिनिधीना जाब विचारून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. गेल्या विस वर्षापासून निवडणुकीत पुल बनविन्याचे खोटे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आपले विजयाचे इत्सिप्त साध्य होताच विकास संदर्भात दिलेले आश्वासन पाच वर्ष भुलून जातात, त्यामुळे मतदारसंघातील विकासाला खिळ बसते, अशाच समस्येत असलेले कोलगांवकर गेल्या विस वर्षापासून गांवा जवळील नाल्यावर पुल कधी बनेल या प्रतिक्षेत आहे, मात्र संबधीत विभाग व लोकप्रतिनिधी आपल्याच तोNयात असल्याने या मार्गावर होणाNया वाहतुकीस जनता त्रस्त झाली. या मार्गाने वेगांव, डोंगरगाव, कोलगांव येथील नागरिक तालुक्याच्या विकाणी कार्यालयीन कामे, शैक्षणिक कामे, शेतकNयांना शेती विषयक कामाकरिता नेहमी यावे लागते मात्र कोलगांव येथील नाल्यावर लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणाने पुल झाला नसल्याच मत परिसरातील नागरीक व्यक्त करीत आहे. या भागाचे खासदार, आमदार, जि.प. सदस्य, पं. स. सदस्य यांनी कोलगांव येथील नाल्यावर पुल बांधून परिसरातील जनतेच्या समस्या दूर कराव्या अन्यथा लॉकडाऊन नंतर जनता रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share