WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मार्डी येथील सील असलेल्या दारू दुकानाची तपासणी

Image

मारेगाव ( यवतमाळ ) : कोरोना विषाणू मुळे लॉक डाऊन दरम्यान मार्डी येथील दारू दुकानाला उत्पादन शुल्क विभागाने सिल ठोकले होते, त्या दुकानाची तपासणी करण्यासाठी २२ एप्रिलला उत्पादन शुल्क विभाग यांनी तपासणी केली असता ९० मिली चे १०० पव्वे कमी असल्याचे निदर्शनात आल्याने सदर दुकाणावर काय कारवाई होते या कडे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील मार्डी येथील सील असलेल्या एका देशी दारू च्या दुकानाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी केली असता त्यात ९० मिली. चे शंभर पव्याची तफावत असल्याचे आढळून आले आहे.सदर प्रकरण वरिष्ठ अधिकारी यांचे कडे सोपविले असून या देशी दारूच्या दुकानावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मार्डी येथे परमानंद जयस्वाल यांचे देशी दारूचे दुकान असून सदर दुकानदार हा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दुकानाचे सील तोडून अवैध रीत्या दारू विक्री करत असल्या बाबतचे अहवाल मारेगाव येथील पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कडे पाठविला असता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त२२ एप्रिल रोजी मार्डी येथील परमानंद जयस्वाल याच्या देशी दारूच्या दुकानाचे सील तोडून तपासणी केली असता , त्यात ९० मिली चे एकूण १०० पव्याची तफावत आढळले असता, सदर अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने वरिष्ठ अधिकार्‍यां कडे सुपूर्द केले आहे.

तपासणी करते वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रवीण मोहतकर, उपनिरीक्षक भटकर, घाटे,कुळसंगे, घाडगे व पंच म्हणून पोलीस पाटील प्रशात पाटील, आदी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share