WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संशयावरून विवाहितेचा खलबत्त्याने ठेचून खून

Image

पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न घाटंजी ( यवतमाळ ):घाटंजी शहरातील घाटी प्रभागातील गुरूदेव वार्डात राहणार्‍या प्रिती रवींद्र भोयर वय ३१ वर्षे हिचा घरातच खलबत्याने डोक्यावर प्रहार करून जागीच ठार करून पतीने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २३ एप्रिल रोजी घडली यानंतर पती रवींद्र भोयर ( ३६ ) याने उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.भोयर दाम्पत्याला एक मुलगी जिविका ( ११), मुलगा विहान ( ७ )अशी दोन मुलं आहे. ही घटना सकाळी उघडकीस आली.

या घटनेची माहिती शेजारच्या लोकांना माहीत होताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या घटनेची माहिती घाटंजी पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे ,पोलीस उपनिरीक्षक राजु घोगरे आणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला व सदर घटना कधी घडली व या घटनेमागील नेमके कारण काय याचा तपास करीत घटनास्थावरून खलबत्ता जप्त करण्यात आला आणी सदर विवाहितेचा मृत्यू कशामुळे झाला यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिनेशचंन्द्र शुक्ला यांनी भेट देऊन पाहणी केली. तर आरोपीस उपचारासाठी यवतमाळ येथे नेल्याचे कळते.

यानंतर या प्रकरणात विवाहितेचा भाऊ निखिल कोकास वय २९ वर्षे रा.भगतसिंग वार्ड वणी यांनी घाटंजी पोलीसात फिर्याद दिली की माझी बहिण प्रिती रवींद्र भोयर रा.गुरूदेव वार्ड घाटी हिच्या चारित्र्यावर तिचा पती रविंद्र भोयर रा गुरूदेव वार्ड घाटी हा नेहमीच संशय घेत होते तेव्हा माझ्या बहिणीचा खून हा चारित्र्यावर संशय घेऊन करण्यात आला व यानंतर उंदीर मारायची औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बहिनीची तब्येत अतिशय खराब असल्याची माहिती मोबाईल वरून भाचीने दिली आहे अशी फिर्याद दिली यावरून पोलिसांनी पती रविंद्र भोयर यांच्या विरोधात भादवी ३०२,३०९ अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंन्द्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू घोगरे करत

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share