WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळात ‘एक पोळी’ उपक्रम

Image

यवतमाळातील पुष्पकुंज सोसायटी, वैष्णोदेवी सोसायटी आर्णी रोड, सत्यनारायण ले-आऊट, आणि दर्डा नगरमध्ये अशा पध्दतीचा उपक्रम महिलांनी हाती घेतला आहे. दररोज अन्न शिजवितांना महिला एका व्यक्तीचे जास्त अन्न शिजवितात. ह्या पोळ्या, भाजी, जमेल ते पदार्थ एका ठिकाणी गोळा करतात. पुष्पकुंज सोसायटी मधिल मारूती मंदिरात ह्या पोळ्या जमा होतात. त्या गरजवंतापर्यंत पोहचविण्यासाठी फुड बॉक्समध्ये जमा केल्या जातात.

यवतमाळ : प्रत्येकाकडे दररोज अन्न शिजविले जाते. हे अन्न शिजवितांना गरजवंताचा विचार करीत दररोज एक पोळी जास्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. असे अतिरिक्त शिजलेले अन्न एकत्रकरून ते गरजवंताच्या झोपड्यांपर्यंत पुरविण्याचे काम सुरू करत आहे. हे कार्य अविरत सुरू आहे. यातून असंख्य गरजवंताची भूक क्षमली जात आहे.यवतमाळातील पुष्पकुंज सोसायटी, वैष्णोदेवी सोसायटी आर्णी रोड, सत्यनारायण ले-आऊट, आणि दर्डा नगरमध्ये अशा पध्दतीचा उपक्रम महिलांनी हाती घेतला आहे. दररोज अन्न शिजवितांना महिला एका व्यक्तीचे जास्त अन्न शिजवितात. ह्या पोळ्या, भाजी, जमेल ते पदार्थ एका ठिकाणी गोळा करतात. पुष्पकुंज सोसायटी मधिल मारूती मंदिरात ह्या पोळ्या जमा होतात. त्या गरजवंतापर्यंत पोहचविण्यासाठी फुड बॉक्समध्ये जमा केल्या जातात.हे अन्न वितरीत करण्याची जबाबदारी प्रतिसाद फाऊंडेशनने घेतली आहे. जमा झालेले भोजन गोळा करू न वंचितांच्या झोपड्यांपर्यंत पोहचविले जात आहे. या उपक्रमात पुष्पा फाळके, दुर्गा फेंडर, आरती वैद्यवार, कल्पणा चौधरी, अपर्णा अंबरकर, शितल रोडे, ज्योत्स्ना काकडे, अनघा तापस, अल्का सोने, संजय जायले, वर्षा शिरसाट, जोसना येंडे, मंगला पाटील, सूचिता आथिलकर, रोशनी पंपालीया, विजया आथीलकर, रूपाली अलोने, अनिता भगत, गायत्री फडके, अनुसया पाटील, मंदा कावलकर, वृषाली लोणकर, कमल मोटवानी, माया दिक्षीत, रंजना गजभिये, अर्चना कठाडे, विमल वानेकर, सोनाली सुरजूशे, उषा बेहरे आदींचा समावेश आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share