WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीचे दोन खेळाडू मेक्सिको मध्ये खेळणार

Image

युवा सपोर्टींग अससोसिएशन, वणी येथील फ़ुटबाँल खेळाडू पुष्कर पंढरीनाथ सोनटक्के मार्की बु, व कुमारी करिष्मा शेख रहीम शेख, वणी यांची मेक्सिको USA मध्ये येथे खेळल्या जाणाऱ्या 'स्लम सॉकर फुटबॉल वर्ल्ड कप' साठी क्रीडा विकास संस्था नागपूर द्वारे भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. मेक्सिको येथे दि. १३ ते १८ नोव्हेंबर २०१८ या दरम्यान आठ देशा अंतर्गत 'स्लम सॉकर फुटबॉल वर्ल्ड कप' स्पर्धा खेळल्या जाणार आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय YFSA वणी फुटबॉल कोच अफरोज भाई व ते आपल्या आई वडिलांना देतात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share