WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जन्नत मॅरेज हॉलच्या संचालकातर्फे 1 लाख 11 हजारांची मदत

Image

वणी येथील जन्नत मॅरेज हॉलचे संचालय मिनाज ग्यासुद्दीन शेख यांनी कोरोना व्हायरस आपत्ती प्रतिबंध उपाय योजनेकरिता मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख 11 हजार रुपयांची मदत केली आहे. आज सोमवारी दिनांक 27 एप्रिल रोजी त्यांनी या रकमेचा धनादेश वणीचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांना सुपुर्द केला.

सध्या कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. व्यापार, उद्योगधंदे बुडाले आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना दरम्यान आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता‍ निधी (कोविड-19) या नावाने अकाउंट उघडण्यात आले आहे.

मिनाज यांच्यातर्फे देण्यात आलेली वणी उपविभागातील ही सर्वात मोठी आर्थिक मदत आहे. त्यांच्या या दानशूरतेमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. त्यांचे मोठे बंधू इजहार शेख यांनीही कोरोना आपत्तीमध्ये 2500 धान्याच्या किटचे शहरात वाटप केले आहे. धनादेश देते वेळी इजहार ग्यासूद्दीन शेख, ओम ठाकुर, अभिजित सोनटक्के, भास्कर गोरे यांची उपस्थिती होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share