WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लॉक डाऊन च्या काळात गरजू लोकांना नाम फाउंडेशन चा मदतिचा हात

Image

---------------------------------------

सिने कलाकार नाना पाटेकरांच्या,मकरंद अनासपुरे नाम फाउंडेशनने केली झरि( जामणी) नागरीकाणा मदत

----------------------------------------

अॅन्कर :- लॉक डाऊन च्या काळात सर्व उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे मजूर वर्गाची उपासमार होत आहे. रोजनदारी वर काम करणारे, शेतकरी मजूर,विधवा, परितक्त्या महिला, अंध, अपंग, यांच्यावर उपासमारिची वेळ आली आहे. त्यांना किराणा किट देवून "नाम फाउंडेशनने"मदतिचा हात दिला आहे.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यां साठी सुरु केलेल्या नाम फाउंडेशन ने आज पर्यन्त अनेकांना मदतिचा हात दिलेला आहे. हीच भावना मनात ठेवून या कोरोणा मुळे आलेल्या संकटावर मात करण्या साठी झरी तालुक्यातील १० गावात २५० गरजू व्यक्तीला किराणा मालाचे वाटप करुन मदतिचा हात दिलेला आहे.

ही मदत यवतमाळ जिल्ह्यातील, झरी,(जमणीं) या तालुक्यात करण्यात येणार आहे. नाम चे विदर्भ, खानदेश प्रमुख श्री.हरीष इथापे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा समन्वयक श्री.नितिन पवार यांच्या पुढाकाराने ही मदत पोहचविन्यात येत आहे. तसेच

आज बहुतांश लोकांवर उपसमारीची वेळ आलेली आहे मात्र समाजातील काही अती मागास, वर्गीय कुटुंबाला गरज असूनही कुणाला माघु शकत नाही अशा घटकांना विशेष करुण ही मदत देण्यात आली आहे. जसे विधव,परित्यत्या महिला,अपंग,ऐकलं महिला अशा वर्गांणा खास करुण ही मदत घरपोच पोहचविन्यात आली आहे .

झरी तालुक्यातील माथार्जून येथून मदतिचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात ३५ गरजूंना ही मदत देण्यात आली. यावेळी तहसीलदार श्री जोशी साहेब, नायब तहसिलदार श्री.खिरेकार, मंडळ अधिकारी श्री.भोयर, पोलीस पाटील श्री प्रकाश गेडाम, चव्हाण साहेब,श्री.उइके साहेब यांच्या हस्ते किट चे वाटप करण्यात आले.

यावेळी धीरज भोयर, प्रशांत भोयर, कुणाल,पूरोषत्तम गेडाम, शरीफ शेख, प्रामुख्याने उपस्थित होते. पुरुषोत्तम गेडाम, झरी (जामणी), यवतमाळ .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share