WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लॉक डाउन काळात गोमांसासह 7 जण ताब्यात....

Image

वणी पोलिसांची कारवाई :- नियमांचे तीनतेरा करून, गोमांस विक्री?..

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ


वणी शहरातील मोमीनपुरा व रजा नगर येथील राहते घरी गाईची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून १००० किलो गोमांस व सात आरोपीना अटक करून त्यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची घटना दिनांक 28 ला घडली आहे.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर शहरात संचार बंदी लागू असताना मोमीनपुरा व रजा नगर येथे गाईची कत्तल करून काही व्यक्ती राहत्या घरून गोमांस विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सहकाऱ्यांसह मोमीनपुरा व रजा नगर येथे धाड टाकून १००० किलो गोमांस व सात आरोपीना अटक केली. आरोपींमध्ये मो.. मो अनिस अब्दुल रशीद कुरेशी वय (४६), तौसिफ़ रईस कुरेशी (३०), मो. नासिर अब्दुल रशीद (५०), मो. ऐजाज अब्दुल अजीज कुरेशी (३८) , मोहम्मद कैसद अब्दुल अजीज कुरेशी (३२), सर्व राहणार मोमोनपूरा, मो. इश्तियाक अब्दुल वहाब (४९), तोहीद इस्तेयाक कुरेशी (१९) रा. रजा नगर वणी यांचा समावेश असून त्यांच्यावर अवैध्य रित्या गोमांस विक्री करणे, संचार बंदीचे उल्लंघन करणे, तोंडाला मास्क न लावणे या अंतर्गत कलम १८८, २६९, भा. द. वि. सह महाराष्ट् प्राणी संरक्षण कायदा १९७६ नुसार कलम ५(ब)(क) ९,९ (अ) सह सहकलम २,३ साथीचे रोग अधिनियम ८१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक एम राजकुमार यवतमाळ, नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात, पो.नी. वैभव जाधव, डी बी प्रमुख पोउपनी गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, पोहवा शेखर वांढरे , पोना सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, संतोष आढाव, पोका पंकज उंबरकर, पोका दीपक वॉन्डरस्वार, पोका अमित पोयाम, अमोल अन्नेरवार, मपोका जया रोगे यांनी केली असून पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share