WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Image

# मशागतीचा पैसा उदरनिर्वाह वर खर्च

# बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्याची गरज

प्रतिनिधी:रोहन आदेवार

कुंभा: कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ताळे बंदी जाहीर केली, त्यामुळे उद्योग धंदे बंद पडल्याने अनेकांच्या हाताचे काम गेले, कमावती मुले गावाला परत आली , त्यातच खरीप हंगाम जवळ आल्याने आशेने शेतकऱ्यांनी मशागतीच्या पैसा गोळा करून ठेवला होता मात्र लॉक डाऊन चा काळात तो उदरनिर्वाह खर्च होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

गत काही वर्षापासून कुंभा परिसरातील शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, सतत चा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग पूर्णतः हतबल झाला आहे, मागील वर्षी झालेल्या नापिकी ची ह्यावर्षी निसर्ग राजा भर भरून काढेल अशा आशेने शेतकरी उसनवारीवर पैसे घेऊन शेती कामाला लावतात,मात्र निसर्ग बळीराजाची साथ देत नाही, त्यामुळे मागील हंगामात हि शेतकऱ्यांचा आशा धुळीस मिळाल्या, परिसरात दिवाळीच्या शुभ पर्वावर अतिवृष्टीने हाती आलेले सोयाबीन पीक काळ वडले तर कपाशीच्या पिकाला मोठा फटका बसला, पिकास सुधारणा होत असताना गुलाबी बोंड आळी ने तोंड वर काढले, त्यामुळे पांढरं सोनं काळ झाल, त्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागले, शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा निराशा झाली यावर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन करून ठेवले होते, मात्र तेही आता कोरणा मुळे कोलमडल्याचे दिसत आहे, शेतीच्या मशागतीसाठी उभा करून ठेवलेला पैसा उदरनिर्वाह साठी खर्च झाल्याने शेतकऱ्यावर चिंतेचे ढग दाटलेले दिसून येत आहे ,त्यात लॉक डाऊन संपेल ,मुले कामाला जातील व नव्या उमेदीने पुन्हा शेती कामास गती देता येईल अशा आशा असताना लॉक डाऊन वाढण्याचे संकेत मिळत असल्याने शेत कर्या मध्ये संभ्रमावस्था आहे, अशा स्थितीत शेतकऱ्याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाले झाली आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share