WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विदर्भस्तरीय धनगर समाजउपवर-वधू परिचय मेळावा

Image

सुरज चाटे वणी - श्री चिंतामणी देवालय, प्रजापती नगर, सुभाष नगर जवळ, साई श्रध्दा हॉस्पिटल समोर, आर्णी रोड, मोठे वडगांव, यवतमाळ येथे दिनांक 23/12/2018 ला सकाळी 11 .00वाजता विदर्भ स्तरीय सर्व शाखीय धनगर समाज उपवर-वधू युवक-युवती च्या 12 व्या परिचय मेळाव्याचे आयोजन धनगर समाज संघटना, Image पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संस्था, संघर्ष समिती, एम्प्लेएज वेलफेअर संघटना, महिला संघटना, जय मल्हार संघटना व मेंढपाळ संघटना जिल्हा यवतमाळ यांच्या संयुक्तल विध्यमाणे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी यवतमाळ येथे जिल्ह्यातील सर्व धनगर बांधवांच्या सहकार्यातून 12 वा उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित केला आहे. कारण समाज बांधवांच्या वेळेची, श्रमाची व प्रवास खर्चाची बचत व्हावी, तसेच एकाच व्यासपीठावर मनपसंत वधू- वरांची निवड करता यावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केले आहे.

तेव्हा सर्व धनगर समाज बांधवाणी मोठ्या संख्येने उपवर-वधूची नोंदणी करून उपस्थित राहण्याचे आवाहन वणी मारेगाव व झरी तालुक्यातील धनगर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी शंकरराव उरकुडे, वसंतराव गोरे, प्रल्हाद चामाटे, काशीनाथ पचकटे, नागेश काकडे, प्रमोद नवघरे, प्रवीण वैद्य, आशिष ढवळे, सुरेन्द्र इखारे, गौरव उगे, विलास शेरकि, संजय आसकर, विकास चिडे, मनोज खाडे, सुर्यभान चिडे, नितीन चहानकार, नितीन वैद्य, विनायक कांडरकर, अक्षय झिले, वैभव उरकुडे, संतोष सांबरे, गजानन तुरारे, सुनील बोधे, राजकुमार बोबडे , यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share