WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बाजारपेठा १७ मेपर्यंत बंदच !

Image

कोरोनाची ही लढाई जिंकून यवतमाळ जिल्ह्याला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणायचे आहे. एवढे दिवस कळ काढली आता आणखी ११ दिवस थांबा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या आवाहनानुसार १७ मेपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवली जाणार असल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू यांनी दिली.
यवतमाळ : तिसरा लॉकडाऊन संपायला आता केवळ ११ दिवस आहेत. त्यामुळे या काळात संयम ठेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, आपली प्रतिष्ठाने बंदच ठेवावीत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. या आवाहनाला चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी लगेच प्रतिसाद देत १७ मेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र यातून बोअरवेल आणि मोबाईल दुरुस्तीला सवलत देण्यात आली आहे. विशेष असे यवतमाळात दारूची दुकानेही बंदच राहणार आहे.उद्योग-व्यापार व व्यवसायातील बंदी उठवावी का या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची ना. संजय राठोड यांनी बैठक बोलविली होती. या बैठकीला आमदार मदन येरावार, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, राजेंद्र जैन, संजय अग्रवाल, राधाकृष्ण जाधवाणी, महेश मुंधडा आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.

द्यापालकमंत्री संजय राठोड यांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आणखी ११ दिवस द्या, अशी विनंती केली. दीड महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय बंद आहेत. आता ११ दिवसांसाठी दुकाने उघडल्यास कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची भीती आहे. परजिल्ह्यातून आणि परराज्यातून मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहेत. नागरिकांची गर्दी बाजारात मोठ्या प्रमाणात उसळत आहे. अशा स्थितीत कोरोनाचा प्रकोप वाढू शकतो.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share