WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तडजोडीनंतर अखेर वणीतील वाईन शॉपी सुरु

Image

प्रशांत चंदनखेडे
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्या करीता देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने शहरातील बहुतांश उद्योग व्यावसायांबरोबरच दारूंची दुकाने देखील मागील दिड महिन्यांपासून बंद असल्याने तळीरामांची पार त्रेधातिरपीट झाली असतांनाच शासनाच्या आदेशानुसार आज जिल्हा प्रशासनाने मान्यता दिल्याने वणीतील वाईन शॉपी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे दीर्घकाळापासून कोरडे असलेले तळीरामांचे घसे आज ओले होणार असल्याने त्यांचे आनंद व झुंबड दोन्ही ओसंडून वाहत आहे.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याकरिता सतत वाढवावा लागत असल्याने अनावश्यक गर्दी निर्माण होणारी दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यात दारूच्या दुकानांनाही पर्वांगी नाकारण्यात आल्याने तळीरामांना दारूची तहान भागविण्या करिता चांगलाच आटापिटा करावा लागत होता. दुप्पट तिप्पट रक्कम मोजून शोक पूर्ण करावे लागायचे. याच दरम्यान अवैध दारू विक्रीही चांगलीच फोफावली होती. अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी शिकंजे कसून त्यांना तुरुंगवारी घडविली. अवैध दारू पुरविणारी कित्येक दुकाने सील तर काही दुकानांचे परवानेही रद्द करण्यात आले. या घडामोडीत काही राजकारणी व सिनेकलाकारांनी मात्र दारूंची दुकाने खुली करण्यावर भर दिला तशा मागण्याही केल्या. त्यांच्यावर टिका टिप्पणीही झाल्या की , तळीरामांच्या कोरडवाहू घश्यांची यांनाच जास्त चिंता असल्याचे बोलल्या गेले. अखेर झोन विभागणीत अडकलेली दारूची दुकाने महसुलाच्या निर्मिती करिता सर्वच झोन मघ्ये (प्रतिबंधित क्षेत्र वगळून) सुरु करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले व जिल्हा प्रशासनाने आज अधिकृत मान्यता देत वणीतील वाईन शॉपी सुरु करण्यांत आल्याने तळीरामांची दीर्घकालीन प्रतीक्षा संपली असून त्यांचे कोरडे घसे आज ओले होणार आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share