WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आणखी झाला तळीरामांचा हिरमोड... जिल्ह्यात मद्यविक्रीला पुन्हा बंदी :- उद्याचा विचार फसला?

Image

....

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

शासनाच्या निर्देशाप्रमाणे अटी व शर्तीला अधीन राहून यवतमाळ शहर वगळता उर्वरीत जिल्ह्यात मद्यविक्रीला ठराविक वेळेत परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच मद्य खरेदीकरीता नागरिकांनी गर्दी केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र दारुबन्दी कायद्यानुसार किरकोळ व ठोक मद्यविक्रीला पुढील आदेशा पर्यन्त बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहे. मात्र तळीरामांचा हिरमोड झाला असून उद्याचा विचार करून आज चूप बसणारे मद्यशौकीन मात्र उद्या दारू घेऊ च्या वांद्यात या निर्णयाने उद्याचा विचार फसल्याचेच दिसून आले.

शासन आणि प्रशासन आपल्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे. मात्र नागरिकांच्या सहकार्याशिवाय आपण ही लढाई जिंकू शकत नाही. या संकटाच्या वेळी प्रशासनाच्या आदेशांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच गर्दी करू नये. बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share