WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

झरी तालुक्यातील प्रा. डाॅ.सतिश पोलशेट्टीवारने दिले महाराष्ट्रातील औषधीशास्त्रसंस्थेतील २५०० प्राध्यापकांना आॅनलाईन प्रशिक्षण

Image

प्रतिनिधी :- राजू कांबळे

यवतमाळ जिल्ह्यातील झरी मागास तालुक्यातील मांगली(हिरापूर)या मुळ गावचे राहिवासी असलेले प्रा.डाॅ.सतिश अरूणराव पोलशेट्टीवार हे M.pharm.Ph.d.असून पुणे येथील M.I.T. WPU school of pharmacy Pune. या नावाजलेल्या संस्थेत प्रोफेसर अॅंड डायरेक्टर करिअर सर्विसेस इन फॅकल्टी आॅफ फाॅर्मसी या पदावर कार्यरत आहेत.आजपर्यंत त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे.

विशेष म्हणजे यांनी कोरोना संक्रमणामुळे उदभवलेल्या लाॅकडाऊन परिस्थितीत फाॅर्मसी विद्यार्थांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता MSBTE द्वारा प्रायोजित व M.C.E. Institute of pharmacy Pune आयोजित संपूर्ण महाराष्ट्रातील औषधी निर्माण शास्त्र संस्थेच्या प्राध्यापकांना सहा दिवशीय दि.२०/०४ २०२० ते २५/०४/२०२० या कालावधित आॅनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेत दिले.

या कार्यशाळेत सुमारे २५००प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डाॅ.व्हि.एन.जगताप आणि सहकारी प्राध्यापकांनी केले.

या कार्यशाळेमुळे अध्यापकांनी विद्यार्थांसाठी बाइंडर एन्टरप्राईझ व्हर्जन,गुगल क्लासरूम आणि गो ब्रॅंच या वेबसाईटचा प्रभावी वापर करून विद्यार्थांसाठी आभासी वर्ग(Virtual classroom)तयार केले. यामध्ये विद्यार्थांना अवघड विषयाचे मार्गदर्शन,पुस्तके,नोटस,प्रश्नावली पाठविण्यात येत आहे. ही प्रश्नावली विद्यार्थ्याकडून आॅनलाईन सोडवून लगेच निकाल पण देण्यात येत आहे.

डाॅ.सतिश पोलशेट्टीवार यांनी औषधी निर्माण शास्त्र शिक्षणाची सुरूवात S.P.M. institute of pharmacy Wani dist yavatmal मधून झाली आहे.

या कार्यशाळेमुळे प्रा. डाॅ.सतिश पोलशेट्टीवार यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.ही बाब यवतमाळ जिल्ह्यातील झरी, वणी,मारेगाव तालुक्याकरिता आनंदाची आणि अभिमानाची आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share