WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लग्नाची वरात वाघनख च्या घरात....

Image

दुल्हन हम ले जयेंगे :- लॉक डाउन काळात आदर्श विवाह सोहळा संपन्न...

वणी :- सुरज चाटे

वणीतील रंगनाथ नगर येथील राहिवासी असलेले आकाश शेंडे यांचा विवाह दिनांक 11 ला योजीला होता. मात्र कोरोनासारख्या भयावह स्थिती मोठ्या जनसंख्येने एकत्र येणे धोक्याचे असल्याने आपल्या वरातीत कोणतीही गर्दी न करता योजिलेल्या मुहूर्तावर व तारखेवरच आपला आदर्श विवाह सोहळा पार पाडून शासनाला सहकार्य करायचे असेच आकाशने ठरविल्याने वणीतील रंगनाथ नगर येथून निघालेला नवरदेव व एका मित्रासहितची वरात वाघनख येथील मुलीच्या घरात नेऊन आपला आदर्श विवाह मोजक्या जनसंख्येत करून तिला घेऊन येऊन आपल्या संसाराची महत्वपूर्ण सुरवात जणू आकाश व पूजा यांनी केली असल्याचे दिसुन आले.

विवाह म्हटला की पैशाची उधळण विविध खर्चांचा डोंगर त्यात ढोल ताशे आतिषबाजी रोषणाई आदीने आपले डोके वर केलेले असते तसे असताना या विवाह मुहूर्तामध्येच कोरोना सारख्या भयावह विषाणूने मोठे थैमान घातले त्यामुळे विवाह योजित केलेल्या काहींनी आपले विवाह समोर केले तर काहींनी उरकवते केले. अशातच रंगनाथ नगर येथील वच्छला शेंडे यांचे द्वितीय चिरंजीव आकाश गिरीधर शेंडे यांचा दिनांक 11 ला विवाह मुहूर्त ठरविला असल्याने त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याआंतर्गत येणाऱ्या वाघनख येथील बंडूजी महाडोळे यांच्या कन्येसह विवाह करण्याची तारीख ठरविल्याप्रमाणे शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत केवळ आपल्या एका मित्रासह वणीतून जाऊन त्याने वरोरा तालुक्यातील वाघनख गाठून आपला आदर्श विवाह सोहळा पार पाडून नवविवाहित नवरी ला घेऊन येऊन बाकी परंपरा नावरदेवाच्या घरी म्हणजे रंगनाथ नगर येथेच पार पडल्या. आकाश ने या घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागतच होत असून सर्वत्र त्याचे कौतुक सुद्धा होत असून या कोरोना सारख्या भयावह स्थितीत या नवीन जोडप्याने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

शासनाला सहकार्य करू नक्की कोरोनवर आपण मात करू ...... आकाश व पूजा शेंडे (नवविवाहित वधुवर)

या कोरोनासारख्या स्थितीत रीतसर शासनाची मंजुरी घेत आम्ही नियोजित वेळेनुसार कोणतेही मंडळी व आदींना जमा न करता साध्या व सोप्या पद्धतीने आम्ही आमचा विवाह केला असून जर आपल्याला कोरोनाला पाळवायचे असेल तर शासनाला सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. चला तर शासनाला सहकार्य करू आणि कोरोनावर मात करू.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share