WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी....

ImageImageImageImageImageImageImage

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिगजांचा सत्कार....

सुरज चाटे :- वणीसह परिसरात ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी वणीतील कर्तव्यदक्ष ठाणेदार तथा वाहतूक पोलीस उपनिरीक्षक यांचा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिगजांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.

वणीत सर्वधर्म समभाव चा संदेश देत मुस्लिम बांधवांनी ईद मिलादुन्नबी मोठ्या आनंदाच्या वातावरणात रॅली काढून ही रॅली शहरातील मुख्य मार्गाने फिरवीत चौका चौकात उभारलेले दृश्य उपस्थितांचा आकर्षणाचा केंद्र बिंदू बनले होते, ठीक ठिकाणी शरबत, पाणी, जेवण आदीची सोय करीत शहरातील मुख्य मार्ग खाती चौक, शिवाजी चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, टागोर चौक, गांधी चौक आदी मुख्य मार्गाने मिरवणूक मोठ्या उत्साहाच्या वातावरणात निघून शिवाजी चौक येथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात वणीचे कर्तव्य दक्ष ठाणेदार बाळासाहेब खाडे तसेच वणी वाहतूक पोलीस उपनिरीक्षक संग्राम ताठे यांचे सुद्धा मदिना कमिटी कडून सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. उत्साहा दरम्यान कोणतेही गाल बोट होऊ नये करिता ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी चोख बंदोबस्त करीत चौका चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच वाहतुकीचे सुद्धा नियोजन योग्य प्रकारे करण्यात आले होते.

शहरातील सर्व मस्जिद मधील मौलाना यांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, तसेच राकेश खुराणा पुसद अर्बन बँक उपाध्यक्ष,राजु भाऊ उम्बरकर मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष,तथा राजाभाऊ पाथ्रळकर ,मगंल तेलंग सर,पुलिस पाटील नितिन शिरपाते याांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला, तसेच मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे सुद्धा सन्मान यावेळी करण्यात आला यात कदीर सेठ,रफीक शेख इब्राहीम भाई, बबब्लु दिवानजी तथा रज्जाक पठाण यांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शहरे मदिना कमेटी सदस्य शाहीद भाई,फारूख रंगरेज,जावेद पठाण,सिध्दीक रंगरेज,सत्तार भाई फुलवाले,समीर बेग,शकील सय्यद,अँड,जाहीद सरीफ,इम्रान शेख,अहेसान भाई,बब्लू शेख,मोबीन शेख,नदीम कदीर,मुख्तियार शेख,अलिम शेख,सर्व मुस्लिम बाधवानी सहर्काय केले.

रक्त दान चे सुद्धा आयोजन

जमात ए इस्लाम हिंद महाराष्ट्र शाखा वणी कडून रक्त दान कॅम्प चे सुद्धा आयोजन शिवाजी चौक वणी येथे करण्यात आले होते यात 135 रक्त दात्यांनी आपले रक्त दान केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share