WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलीस शिपाईच दारू तस्करी करतो तेव्हा?....

Image

शिरपूर पोलिसांची कारवाई :- सोळा हजाराच्या दारू सह अटक...

सुरज चाटे वणी (तालुका प्रतिनिधी) :-

कोरोना मुळे सम्पूर्ण लॉक डाऊन करण्यात आले आहे या दरम्यान मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू होती पोलिसांनी अनेक दारू तस्करावर कारवाई करण्यात आली होती मात्र आता चक्क पोलीस शिपाईच दारू तस्करी करीत असल्याचे आढळून आले असून शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाला अटक केली असल्याची घटना दिनांक 13 ला उघडकीस आली आहे.

कोरोनासारख्या मोठ्या भयावह आजाराने सर्वत्र वेढा टाकला असून भारतात देखील लॉक डाऊन करण्यात आले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे या दरम्यान दारूचे दुकानही बंद करण्यात आले होते, तळीरामांची मोठी फजिती झाली होती तळीरामांचे चोचले पुरवण्या करिता अवैध दारू विक्री सुरू झाली होती, तर काहींवर कारवाईचा बडगा सुद्धा झाला आहे. लगतच असलेल्या चंद्रपूर जिल्हात दारू बंदी असल्याने तेथील मध्यापिची नजर वणी कडे होती जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यप्रेमीचा ओढा शहराकडे वाढला होता आड रस्त्याच्या मार्गाने अनेक जणांनी वणीत येऊन आपली तृष्णा भागविली यात पोलिसही मागे राहिले नाही चंद्रपूर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस शिपाई मोरेश्वर दिलीप गोरे वय 34 हा एम एच 26 यु 0786 या टाटा सफारी वाहनाने वणीत आला व त्याने विदेशी दारूचे 750 एम एल चे 12 बंपर दारू घेतली व तो चंद्रपूर चे दिशेने निघाला शिरपूर पोलीस ठाण्या हद्दीत येत असलेल्या बेलोरा येथे केलेल्या नाकेबंदी दरम्यान या वाहनांची तपासणी करण्यात आली असता वाहनात सोळा हजार रुपये किमतीची विदेशी दारू आढळून आली वाहन चालवत असलेल्या गोरे याला ताब्यात घेतले असता त्याने आपण पोलीस असल्याची बतावणी केल्याने शिरपूरचे ठाणेदार अनिल राऊत चक्क झाले मात्र गुन्हा तो गुन्हा असतो मग तो पोलिस असो की कुणीही असो त्याला ताब्यात घेऊन चार लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसच दारू तस्करी करीत असताना आढळून आल्याने, पोलिस शिपाईच दारू तस्करी करतो तेव्हा? असा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून याची चांगलीच चर्चा परिसरात होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share