WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आदिलाबाद येथून आलेल्या कुटुंबाला १४ दिवसा करीता कोरंटाईन केले

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-
कोरणाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतात अडकून असलेले नागरिक मिळेल त्या साधनाने स्वगावी परत येत असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम कोरंटाईन किंवा अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. अशाच एका आदिलाबाद वरून परतलेल्या कुटुंबाला माथार्जुन येथील जिल्हापरिषद शाळेत कोरंटाईन करण्यात आले आहे. माथार्जुन येथील रहिवासी असलेला जावेद शेख हा आपल्या पत्नीसह रोजगारा करिता आदिलाबाद येथे वास्तव्यास होता. परंतु लॉकडाऊन काळात रोजगाराच्या वाटा कमी झाल्याने तो आपल्या कुटुंबासह माथार्जुन येथे परत आला असता त्याला कुटुंबासह जिल्हा परिषद शाळेत १४ दिवसांकरिता ग्रामविस्तार अधिकारी विजय उईके यांनी कोरंटाईन केले आहे. ग्रामीण भागातील बरीचशी मंडळी रोजगाराकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच परप्रांतात अडकली आहे, लॉकडाऊनमुळे रोजगार हिरवाल्याने बऱ्याचशा लोकांनी गावाचे रस्ते धरले आहेत. परंतु गावातही त्यांना घरी जाऊ न देता आधी १४ दिवसदिवसांचा कोरंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share