WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिक्षणाचे बाजारीकरण व बेरोजगारी वाढविणाऱ्या धोरणाविरुद्ध लढा करून सरकारला धोरणे बदलण्यास बाधà

Image

  • वणी येथे डीवायएफआय ची बैठक संपन्न
  • बैठकीत डीवायएफआयचे निमंत्रक म्हणून प्रफुल पाटील यांची निवड
  • सुरज चाटे वणी - देशात सरकारे बदलत आहेत, सरकार मधील पक्षही बदलत आहेत, परंतु देशातील गरिबी कमी होण्याऐवजी वाढत आहे. १९९० नंतर स्वीकारलेल्या धोरणामुळे तर गरिबी वाढण्यासोबत सोबत शिक्षण,आरोग्याचे खाजगीकरण केल्या जात आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. सरकारे बदलली तरी धोरणे तीच आहेत. म्हणून धोरणे बद्दलविण्यासाठी व सर्वांना शिक्षण व सर्वांना रोजगारासाठी डी वाय एफ आय च्या नेतृत्वात लढा द्या, असे आवाहन वणी येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया च्या राज्य सचिव प्रीतिशेखर( मुबई ) यांनी केले.

    Image

    या बैठकीला माकपचे कॉ शंकरराव दानव, कॉ कुमार मोहरमपुरी व डी वाय एफ आय चे राज्य सहसचिव जनार्दन काळे(नांदेड) तसेच एस एफ आय चे राज्य सचिव बालाजी कलेटवाड यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीत निमंत्रण समिती बनविण्यात येऊन निमंत्रक म्हणून प्रफुल पाटील यांची निवड करण्यात आली. संघटनेची सदस्यता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच सोबत जानेवारी महिन्यात होणाऱ्या राज्य अधिवेशनासाठी प्रतिनिधी सुद्धा निवडण्यात आले. या विशेष बैठकीला कवडू चांदेकर,सुदर्शन टेकाम,प्रभाकर पेंदोर,अशोक येल्लावार,सिनु दासारी,राजाराम प्रजापती,दत्तू डाहूले,समीर आत्राम,उत्तम सोयाम, महेश सोनटक्के,आचल मुन,भाग्यश्री लोखंडे,प्रशांत कुळमेथे, हुसेन सुरपाम,अमर्त्य मोहरमपुरी,वैभव मजगवळी,कृष्णा मडकाम,सुभाष नांदेकर आदी उपस्थित होते.

    वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



    share