WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

परठिकाणांवरून शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य तपासण्या योग्यरीत्या केल्या जातात, प्रशासनाचे स्पष्टीकरण

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात घर वापसी होत असून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक नागरिकांची पळसोनी येथील कोविड केंद्रात तपासणी करण्यात आल्यानंतरच त्यांना होम कॉरंटाईन करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले असून आजच्या घडीला शहरात आगमन झालेल्या ७५७ नागरिकांची तपासणी करून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून होम कॉरंटाईन करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

राज्यात कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले असून रुग्ण संख्याही ३५ हजारापार गेली आहे.राज्यातील नागपूर,पुणे,मुंबई,औरंगाबाद ही महानगरें कोरोनाचे हॉसस्पॉट ठरली असून रोजगार व शिक्षणाकरिता वास्तव्यास असलेले नागरिक लॉकडाऊनमुळे याठिकाणी अडकले होते. परंतु शासन व प्रशासनाने त्यांना स्वगावी जाण्याकरिता वाहतुकीची व्यवस्था करून दिल्याने परठिकाणी अडकलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात घरवापसी होत आहे. अतिसंवेदनशील भागातून येणाऱ्या नागरिकांची पळसोनी कोविड सेंटरमध्ये योग्यरीत्या आरोग्य तपासणी करूनच शहरात एंट्री दिल्या जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आरोग्य प्रशासनातर्फे शहरापासून ५ किमी अंतरावर कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी परठिकाणावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची थर्मल स्क्यानर मशीनने तपासणी करण्यात येऊन कोविडची तिळमात्रही लक्षणे नसलेल्यांच्याच हातावर होम कॉरंटाईनचे शिक्के मारून त्यांना १४ दिवसांकरिता घरातच राहण्याचे कडकडीने सांगितले जाते. याठिकाणी कंत्राटी कर्मचारी असले तरी त्यांना वैद्यकीय पात्रतेनुसारच तेथे रुजू करण्यात आले. आरोग्य विभागाच्या देखरेखीतच तेथील कारभार सुरु असून प्रत्येक कर्मचारी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहे. वसतिगृहात मुबलक जागा आहे पण चार भिंतींमध्ये गरमीने घुटमळ न होता झाडाखाली खुल्या हवेत तपासणी होत असल्याने तपासणी करणारे व तपासणीसाठी येणारे दोघेही समाधानी आहेत. चोरून लपून शहरात दाखल झालेलेच सुटले असतील परंतु रस्तेमार्गे शहरात येणाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना शहरात सोडले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासण्या होत नसल्याचे वृत्त पसरविल्या जात असल्याने आत्मीयतेने सेवा देणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत असून कामे करूनही कामचुकारपणाचा ठपका लागत असल्याने कर्मचारीही सेवा पुरविताना डगमगत आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव अद्याप झालेला नाही व समोरही होणार नाही याची पूर्णता खबरदारी घेतल्या जात असून आरोग्य विभाग याकडे बारकाईने लक्ष ठेऊन आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नाही अशांना होम कॉ रंटाईन केल्या जात असून ते बाहेर फिरतांना आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही ही करण्यात आली आहे. शेवटी नागरिकांचीही जबाबदारी असते की हातावर शिक्का असतांना बाहेर फिरू नये. प्रशासन एका एका व्यक्तीवर तर लक्ष ठेऊ शकत नाही ! होम कॉरनटाईन करण्यामागचे कारण हेच असते की १४ दिवसांच्या अंतराळात व्यक्तींना कोणतेही कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्यांचे थ्रोट स्वाब घेऊन प्रयोग शाळेत पाठविण्यात येतील. त्यामुळे कोणतीही शहनिशा न करता तपासणी होत नसल्याच्या अफवा पसरवून मनोभावे सेवा करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करू नये अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share