WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील दोन व्यक्तींना आयसोलेशन मध्ये पाठवले

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :- तालुक्यातील पेटूर गावालगत असलेल्या उमरी येथील दोन महिला रुग्णांनमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांना पांढरकवडा येथील आयसोलेशन विभागात उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.

कोरोनाचे मोठ्या प्रमाणात उत्पिडन होत असलेल्या मुंबई महानगरातून स्वगावी उमरी येथे परतलेल्या चार व्यक्तींना जिल्हापरिषद शाळेत कॉरंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी एका महिलेला तीव्र ताप व घस्यात वेदना अशी गंभीर स्वरूपाची लक्षणे तर दुसऱ्या महिलेला सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना पांढरकवडा येथील आयसोलेशन विभागात पाठवण्यात आले असून अन्य दोन व्यक्तींना पळसोनी येथील कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. पांढरकवडा आयसोलेशन विभागात त्या दोन महिला रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे अजून कळू शकलेले नाही. त्यांचे टेस्टिंग रिपोर्ट प्राप्त झाल्या नंतरच त्यांच्या आजाराचे निदान होईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे जे नागरिक अतिसंवेदनशील शहरांतून येत आहेत त्यांनी आरोग्य विभागाला कळवून स्वतःहून आपल्या तपासण्या करून घ्याव्यात तसेच होम कॉरंटाईन केले गेल्यास सुचविलेल्या कालावधी पर्यंत घरातच राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share