WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिक्षणा विना मनुष्य अधुरा, शिकून जीवनात एक चांगला मनुष्य बना....... डॉ. लोढा..

Image

सुरज चाटे वणी :- शिक्षण हे जिवनात किती महत्वाचे आहे त्याचे महत्व काय याबद्दल विस्तृत असे मार्गदर्षन करतांना वणीतील प्रसिध्द डॉ. लोढा यांनी चंद्रपुर येथील चांदा पब्लिक स्कुल येथे नुकताच पार पडलेल्या सोहळया दरम्यान प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले आहे. त्यात या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन ते गेले होते या कार्यक्रमात चंद्रपुर जिल्हयाचे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संस्थेचे अध्यक्ष जिवतोडे मॅडम, विकास जैन, शाळेचे प्राचार्य पांडे मॅडम आदी उपस्थित होते. Image

चंद्रपुर येथे नुकत्याच पार पडलेल्या चांदा पब्लिक स्कुल च्या वार्षिक कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. महेंन्द्र लोढा, चंद्रपुर जिल्हयाचे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संस्थेचे अध्यक्ष जिवतोडे मॅडम, विकास जैन, शाळेचे प्राचार्य पांडे मॅडम आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यात उपस्थितांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जिवनात काय केले पाहिजे आपण कसे घडलो या बद्दल विस्तृत असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसहीत पालकांना केले. वणीतील डॉ. लोढा यांनी विद्यार्थ्यांना मी कसा घडलो माझे जिवनकार्य या बद्दल मौलिक असे मार्गदर्शन करून त्यांना सांगितले की, प्रत्येक गोष्ट घडविण्याकरीता मेहनती शिवाय पर्याय नसुन जर प्रयत्न केले तर ती गोश्ट सहज आपली होउु शकते एक चांगली नौकरीच लागणे हे आपले ध्येय नसुन जिवनात एक चांगला माणुस बनुन दाखविण्याची जिद्द व तयारी ज्या विद्यार्थ्यांमध्ये असेल तो विद्यार्थी जिवनात कधीच मागे पडु शकत नाही. तसेच शिक्षण हे वाघिणीचे दुध असुन शिक्षणा शिवाय माणुस तसेच विद्यार्थी हा अपुराच समजला जातो आजच्या आधुनिक जगात शिक्षणाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वतः शिकले तरच आपले आयुश्य समोर घडवु शकता नाही तर नंतर चांगले षिकलो असतो तर बर झालं असतं असेच म्हणावे लागेल कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असुन त्यामुळेच परिस्थितीवर मात करून जो शिक्षणाच्या दिशेने योग्य पाउुन उचलतो त्याला कितीही अडचणीचा सामना करावा लागला तरी तो न डगमगता स्वतःला त्यापासुन आवरून खंबीर पणे उभा राहतो. उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन करीत त्यांना सांगितले की, मी कसा घडलो जिद्द चिकाटी जर असली तर कोणतेही कर्म कठिण नसते त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविश्याच्या शुभेच्छा देत भविश्यात मोठे कार्य करा चुका होतच राहतात मात्र त्या चुकीला दुरूस्त करून जो समोर जातो त्यालाच यश प्राप्त होते असे देखिल या प्रसंगी डॉ. लोढा यांनी बोलुन दाखविले. चंद्रपुर जिल्हयाचे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी देखिल उपस्थित विद्यार्थ्यांना उत्कृश्ट मार्गदर्षन करीत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या, त्यांनी सांगितले की, कोणताही प्रसंग आला तरी त्याला न डगमगता प्रयत्न करीत राहणे एक दिवस नक्कीच आपण त्या कार्यात यशस्वी व्हाल असे त्यांनी आपल्या भाशणातुन व्यक्त केले. या कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवीत करून त्यांना एक नवी वळन त्यांना निर्माण करून देत संस्थेचे अध्यक्ष जिवतोडे मॅडम यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मौल्यवान मार्गदर्शन करीत अभ्यास कसा करावा व शैक्षणिक दृश्टया सक्षम कसे राहावे याबद्दल त्यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जेवढा अभ्यास महत्वाचा असतो तेवढेच खेळणे व बाकी सुध्दा रोजनिशीतील कृती देखिल आवष्यक असते त्यांनी आपल्या संस्थे बद्दल माहिती देत संस्थेचे प्रगतीपत्रक उपस्थितांसमोर मांडले. या कार्यक्रमाचे संचालन शाळेेेच्या प्राचार्या पांडे मॅडम यांनी केले तर आभार शाळेतील विध्यार्थ्याने मानले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share