WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी तालुक्यातील बियरबार सुरु

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने बहुतांश व्यवसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. परंतु लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढत असल्याने आर्थिक डबघाईस आलेल्या उद्योजक व व्यावसायिकांनी उद्योग व्यवसाय सुरु करण्या करिता शासन दरबारी तगादा लावल्याने लॉकडाउनच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात बहुतांश उदयोग व्यवसायांना नियमांचे बंधन घालून लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली. परंतु बियरबार, रेष्ट्रारंट, शॉपींगमॉल, चित्रपट गृहे, हॉटेल्स असे अनेक सामूहिक एकत्रीकरणाशी निगडित व्यवसाय सुरु करण्यास परवानगी नाकारण्यात आली. वाईन शॉपी सुरु झाल्याने बारधारकांनाही टेबल न लावता सीलबंद दारू विक्री करण्यास परवानगी मिळावी अशा मागण्याही जोर धरू लागल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अखेर बार धारकांना सीलबंद दारू विक्री करण्यास परवानगी दिली व १९ मे रोजी शासकीय आदेशाच्या प्रती जिल्हा प्रशासनाला पाठविल्या. शासनाच्या आदेशाची अंलबजावणी करीत जिल्हा प्रशासनाने बार धारकांना लेखी सूचना देत बार सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली असल्याने २३ मे पासून बंद असलेल्या बियरबारचे दरवाजे खुले झाले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशाचे अर्थचक्र मंदावले असून राज्याची अर्थव्यवस्थाही रसातळाला आली आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या उद्योग व्यवसायांमुळे उद्योजक व व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून शासनाचाही कोट्यावधीचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची चाके हळूहळू रुळावर यावी याकरिता नियमांची अट घालून बंद असलेल्या व्यवसायांना सुरु करण्यास लॉकडाऊन मधून सूट दिल्या जात आहे. परंतु प्रतिबंधित क्षेत्रांना यातून पूर्णतः वगळण्यात आले आहे. बार धारकांना बार मध्ये साठवून असलेलीच दारू विकता येईल. तीही एम आर पी दरानेच. बारमधील साठा संपल्यास त्यांना संबंधित उत्पादन शुल्क अधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक राहील तसेच मद्यसाठा संपल्यानंतर बारधारकांना पुढील आदेशापर्यंत मद्य खरेदी करता येणार नाही. त्यांनी वाईनशॉपी किंवा इतर मार्गाने मद्य खरेदीचा प्रयत्न केल्यास दोघांवरही नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळूनच मद्यविक्री करावी लागेल. बारमध्ये बसून मद्य सेवन करतांना कुणी आढळल्यास आदेश भंगाची कार्यवाही केल्या जाईल. बियरची डेट एक्सपायरी झाल्यास ती विकू नये. या नियमांच्या अधीन राहूनच बरधारकांना मद्यविक्री करता येणार असून सोशल डिस्टंसिन कडे विशेष लक्ष देण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share