WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजुर कॉलरी येथील सहा दुकाने आगीत जळून खाक..... दुकानदारांचे मोठे नुकसान :- सुदैवाने जीवित हानी व मोठी घटना टळली....

Image

वणी :- सुरज चाटे
वणी तालुक्यातून व शहरातून 6 किमी अंतरावर असलेल्या राजूर कॉलरी येथे डी पी वरील शॉर्ट सर्किट मूळे डी पी शेजारी असलेल्या दुकानांना आग लागून भस्मसात झाल्याची माहिती असून घटना दिनांक 23 ला दुपारच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथील बुद्ध विहार समोर असलेल्या जुन्या आठवडी बाजारातील वीज मंडळाच्या डी पी ला जी प शाळेजवळील विजेच्या खांबेचे काम केल्या नंतर जसा वीज पुरवठा सुरू झाला तसेच बुद्ध विहाराजवळील डी पी वर स्पार्क झाला आणि ठिणग्या उडून शेजारील दुकानावर पडल्या आणि आग लागली झालेल्या शॉर्ट सर्किट मूळे शेजारी लागून असलेल्या दुकानांना आग लागली. उन्हाळा व प्रचंड उष्णतामान असल्याने तीव्र पणे आगीने रौद्र रूप धारण केले त्यात सहा दुकाने यात मोह गुलशेख शहा मोहम्मद- कोंबडी दुकान, तौसिफ अहमद - कोंबडी दुकान, शेषराव दाढे- भाजीपाला दुकान, गणेश गोपाल हिकरे- बकरा मटण विक्री, शंकर हिकरे - बकरा मास विक्री, दत्ताजी क्षीरसागर कपडे इस्त्री दुकान या दुकानांना आग लागल्याचे निदर्शनास येताच परिसरातील व घटनास्थळी उपस्थितांनी पाणी आणून टाकल्याने आग थोडी आटोक्यात आली परंतु तोपर्यंत दुकाने बऱ्यापैकी जळाली होती. त्यानंतर अग्निशमन वाहन आल्यानंतर पूर्णपणे आग विझविण्यात आली.

आग लागल्याचे कळताच गावातील पोलीस पाटील घटनास्थळी हजर होऊन त्यांनी अग्निशमन विभागाला संपर्क केला व स्थानिक जनतेला घेऊन पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठी घटना टळली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु संबंधित जळालेल्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share