WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील वाईनशॉप व बार मधून ज्यादा दराने मद्यविक्री

Image

प्रशांत चंदनखेडे वणी

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच दिवसांपासून बंद असलेले वाईनशॉप सुरु झाल्यानंतर बियरबार धारकांनाही बार चालू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. वाईनशॉपमध्ये छापिव किमतीने मद्यविक्री करण्याचे सुरुवातीपासूनचेच आदेश असून बारधारकांनाही छापिव किमतीनेच मद्य विकण्याचे प्रशासनाने आदेश दिले असतांनाही आदेशांना झुगारून बारधारक वाढिव किमतीने मद्यविक्री करीत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून एका वाईनशॉप मधूनही चढ्या किमतीने मद्यविक्री होत असल्याचे समोर आले आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेली सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरु झाली असून सोशल डिस्टंसीन पाळून मद्यविक्री सुरु करण्याचे शासकीय स्तरावरून आदेश देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनानेही त्यावर मोहर लावून वाईनशॉप सुरु करण्यास परवानगी दिली. त्यातही दोन राजकीय धुरंधरांमध्ये वर्चस्वाचे राजकारण चांगलेच रंगले. आरोप प्रत्यारोप व तक्रारींच्या फैरी झडल्या. या सर्व घडामोडीनंतर अखेर वाईनशॉप पूर्ववत सुरु झाले. परंतु शहरात असलेल्या दोन वाईनशॉप पैकी एका वाईनशॉप मधून वाढीव किमतीने मद्यविक्री होत असून ग्राहकांची चांगलीच लूट करण्यात येत आहे. राजकीय वजण असलेल्या या वाईनशॉप मधून स्वमर्जीचा कोरोना टॅक्स लावून चढ्या किमतीने मद्य विकल्या जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. मद्यावर शासनाने कोरोना टॅक्स लावला असावा या कारणाने दुसऱ्या वाइनशॉपमध्ये पडताळणी केली असता त्या वाइनशॉप मधून छापिव किमतीनेच मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आले. मग एकाच वाईनशॉपमध्ये येणाऱ्या मद्यावर शासनाने कोरोना टॅक्स कसा काय लावला हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. वाढीव किमतीने मद्य विकून विक्रेते बंद असलेल्या दिवसांची कसर तर काढत नसतील ना ही एकच चर्चा ग्राहकांमधून ऐकायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांचेच रोजगार ठप्प होते.काहींचे तर रोजगारही हिरावल्या गेले आहेत. तरीही दारूचे शौक पुरवावेच लागत असल्याने मद्यप्रेमी कशीबशी पैशाची जुळवणूक करून मद्य घ्यावयास जातात तेंव्हा त्यांना वाढीव रक्कम मोजावी लागत असल्याने त्यांचा संतापाने चांगलाच पारा चढत आहे. मद्यविक्रेत्यांकडून ग्राहकांची आर्थिक लूट होत असून स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे ही मागणी नागरिकांमधून होत आहे. दुसरीकडे बारधारकही वाढीव किमतीने मद्य विकत असल्याचे पाहायला मिळत आहे. बारमध्ये मद्य सेवन न करू देता छापिव किमतीने मद्य विकण्याचे बरधारकांना आदेश देण्यात आले आहे. परंतु बहुतांश बारधारक ग्राहकांना बारमध्ये मद्य पिण्याची मुभा देत त्यांच्याकडून ज्यादा रक्कम वसूल करित आहेत. प्रशासनाच्या आदेशाच्या पूर्णता विपरीत वाईनशॉप व बारधारकांनी मद्यविक्रीचे धोरण अवलंबिले असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे हीच मागणी जनतेतून होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share