WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

व्हाट्सअप व फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

Image

प्रशांत चंदनखेडे वणी

व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून मुख्यामंत्री उद्धव ठाकरे तथा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शहरातील दोन नामांकित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार असून उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असतांनाही गुजरात कडे निघालेल्या दोन साधू व एका ड्रायव्हरची पालघर जिल्ह्यातील गाडचिंचले गावात जमावाने संशयातून निर्दयीपणे हत्या केली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा बु. गावातील मठात राहणाऱ्या दोन साधूंची गावातीलच एका इसमाने हत्या केल्याने राज्यात संताप व्यक्त केल्या जात आहे. चोरीच्या उद्देशाने मठात घुसलेल्या त्या इसमाने विरोध करणाऱ्या साधूंची हत्या केल्याचे समजते. या दोन्ही घटनांचे राजकारण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राहुल गांधी व शरद पवार यांचे आक्षेपार्ह फोटो व्हाट्सअप ग्रुपवर टाकून त्यांच्या विषयी खेदजनक मजकूर लिहिल्या प्रकरणी सतीश निळकंठराव पिपरे (५५) रा. नांदेपेरा रोड तसेच फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्री व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आक्षेपार्ह फोटो वायरल करून खेदजनक टिप्पणी करणाऱ्या विवेक पांडे (३५) रा. गांधी चौक यांच्या विरुद्ध शिवसेना तालुका प्रमुख रवी बोढेकर यांच्या तक्रारी वरून वणी पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ५०१ व ५०४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share