WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) गावात घडली असून आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातीलच सुरज रवींद्र मुसळे या तरुणासोबत प्रेम संबंध जुळले होते. त्यातच त्याने तिला वारंवार फोन करून भेटण्यासाठीचा तगादा लावला परंतु तिने नेहमी नकारच दिल्याने त्याचे तिच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न असफल राहिल्याने अखेर सुरजने तिला लग्न करण्याच्या बहाण्याने वणीला बोलावले व तेथून आपल्या गावी नेऊन तिच्या सोबत लग्न न करता एकत्र राहू लागला. या काळात त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फेब्रुवारी २०१९ पासून तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. यादरम्यान तिला वडिलांचे बोलावणे आल्याने ती आईला भेटण्या करीता गेली असता सुरजने तिला घरात कोम्बुन बेदम मारहाण केली व तिला खाली आपटून जबरदस्तीने जहरिलें लिक्विड पाजले. त्यात ती बेशुद्ध झाल्याने सुरज घाबरला व नंतर त्यानेच तिला वणी ग्रामीण रुग्नालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर परत तिला तो गावाला घेऊन गेला. परंतु या प्रकारामुळे भयभीत झालेल्या मुलीने वणी पोलीस स्टेशन गाठून सुरज मुसळे विरुध्द लैंगिक शोषण व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची रीतसर तक्रार दिली असून तिला वैद्यकीय तपासणी करीता यवतमाळला पाठविण्यात आले आहे. पीडित मुलीच्या तक्रारी नुसार सुरजवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार भादवि च्या कलम ५४७/२०क, ३६३(अ), ३४४,३७६(२),३०७/५०६ व सहकलमांनुसार गुन्हा नोंदवून त्यास अटक करून २६ मे ला नायालयात हजार केले असता नायालयाने २९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share