WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील मोमीनपुरा परिसरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील मोमीनपुरा परिसरात एकाच समुदायायतील दोन गटांमध्ये जुन्या वादातुन जबर हाणामारी झाल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. अर्धेधिक शहर झोपी गेले असताना हे टोळीयुद्ध घडल्याने वणीकरांना चांगलाच धक्का बसला आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास एखाद्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर आक्रमण करून त्याला घायाळ करण्यात येत असतानाच त्याचे सहकारी त्याला वाचविण्याकरिता आल्याने, त्यांच्यावरही हल्ला चढवला गेल्याने, त्यांनीही पलटवार वार केल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली असतांना जनतेच्या पाठीराख्यांनी ताफ्यासह वेळीच घटना स्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने फार मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी दोन्ही गटांतील म्होरक्यासह इतर बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालायाने चौदाही आरोपीना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून दोन्ही गटातील आरोपिंना वणी व मारेगाव अश्या दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.

मोमीनपुऱ्यातील रहिवासी असलेले जमीर खान उर्फ जम्मू यांच्यावर अब्दुल मजीद अब्दुल सत्तार याने २१ एप्रिलला हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यावेळी अब्दुल मजीद यांच्यावर पोलीस कार्यवाही झाली होती . जमीर खान यांनी तीच खद मनात ठेवून त्याचा वचपा काढण्याकरिता त्याच्यावर पाळत ठेवली होती. २७ मेच्या मध्यरात्री अब्दुल मजीद घरी जात असताना त्याला दर्ग्याजवळ अडवून बेदम मारहाण करण्यात येत असतानाच त्याचा भाऊ हाफिज टापू हा त्याला वाचविण्याकरिता गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. ही माहिती इजहार शेख यांच्या गटातील लोकांना मिळताच तेही मोमीनपुरा येथे आले. व त्यांनी अब्दुल मजीद याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता जमीर खान गटातील लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याने दोन्ही गट आमने सामने भिडले. लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारू लागले. याचदरम्यान कोणीतरी पोलिसांना कळविल्याने डी वाय एस पी सुशील कुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव हे आपल्या ताफ्यायासह घटनास्थळी पोहोचले व जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटातील १४ आरोपीना अटक करून त्यातील जखमींना ग्रामीन रुग्णालयात दाखल केले तर गंभीर जखमींना चंद्रपूर येथे रेफर केले. या संदर्भात दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दिली आहे. अब्दुल हाफिज उर्फ टापू अब्दुल सत्तार याने दिलेल्या तक्रारीवरून जमीर खान उर्फ जम्मू मोहम्मद खान (३८), बबलू अहमद शेख (३९), बाबुलाल उर्फ सैय्यद आरिफ सै. शौकत (४५), शाहेबाज शब्बीर चिनी(२६), अक्रम खान सलीम खान(३५), एजाज अली ताहीर अली(३५), अब्दुल मकबूल उर्फ पायलट अब्दुल रज्जाक (४०) सर्व राहणार मोमीनपुरा यांच्यावर भादवीच्या कलम १४७, १४८, १४९, ३०७, ३२४, ४५२, १८८, २६९, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला. तर जमीर खान उर्फ जम्मू मेहबूब खान यांच्या तक्रारीवरून इजहार ग्यासौद्दीन शेख, वय 40, रा. गुरूनगर, अब्दुल हाफिज उर्फ टापु अब्दुल सत्तार वय 35, रा- मोमीनपुरा, राजु फरिदाजी अडकिने वय 51 रा रंगनाथ, नगर, मो- वसीम मो- जाबीर वय 28 रा-मोमीनपुरा, हैदर खान वहिद खान वय 25 रा- गुरूनगर, सैयद तौसिफ सै- अब्दुल वय 42 वर्ष, रा- गुरूनगर, खुर्शीद हुसेन आबिद हुसेन वय 38 वर्ष रा- साईनगरी वणी यांच्यावर भादवि च्या कलम 147, 148, 149, 307, 324, 188, 269, 504, 506 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार जमीर खान व त्यांच्या समर्थकांना मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये तर इजहार शेख व त्यांच्या समर्थकांना वणी पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, स पो नि फटिंग, पो उ नि प्रताप बाजड, डी बी पथकाचे गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, विठ्ठल बुरेवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, गजानन भांदककर, इकबाल शेख, रवी इसनकर, सचिन गाडगे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार, अमित पोयाम, अमोल नूनेलवार यांनी केली आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share