WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोळशाची वाहतूक करणारे छोटे वाहतूकदार अडचणीत

Image

प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- कोरोना या महाभयंकर आजारानं जनजीवन पुरतं विस्कळीत केलं आहे. या आजाराने शारीरिक हानी तर होतच आहे. पण लोकांवर मानसिक दडपण ही आलं आहे. प्रत्येक जीव भीतीच्या सावटात वावरत आहे. या आजारानं जनतेचं आरोग्य तर धोक्यात आलच आहे पण त्यांच्यात आर्थिक कमजोरीही आली आहे. ज्याच्या त्याच्या चेहऱ्यांवर चिंता झळकत असून जीवनात नैराश्य पसरलं आहे. याच नैराश्यातून अनेकांनी आपले जीवन संपवले आहे. रोजगार मंदावले असल्याने अर्धपोटी उपाशी राहण्याची वेळही कित्येकांवर आलेली आहे. छोटया मोठ्या अनेक उद्योगांना गळती लागल्याने जीवन जगणेही कठीण झाले आहे. या लॉकडाऊने तर जीवनच लॉकडाऊन करून सोडले आहे. लॉकडाऊनमुळे असणाऱ्या बंदीची झळ इतर व्यवसायांबरोबरच कोल ट्रान्सपोर्ट व्यवसायालाही चांगलीच बसली आहे. वणी तालुका कोळसा खदानींनी वेढला असल्याने याठिकानांवरून कोळश्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रत्येक खदानींमधून रेल्वे साइडिंगवर येणारा कोळसा हायवा ट्रक व टिप्परच्या माध्यमातून आणला जातो. एका खदानीमधून जवळपास १०० ते १५० ट्रक कोळसा वहन करतात. अशा प्रमुख नऊ खंदाणी कोळसा उत्पादनात अग्रेसर आहेत. या खदानींमधून शेकडो ट्रकांद्वारे कोळशाची वाहतूक नित्यनियमित सुरु असते. साइडिंग व्यतरिक्त खाजगी वीजकेंद्र व कोलडेपो मधेही खदानींमधून कोळश्याची वाहतूक केल्या जाते. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून कोलट्रान्सपोर्ट व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. अविरत धावणारी ट्रकांची चाके कित्येक दिवसांपासून थांबली आहेत. त्यामुळे या व्यवसायावर आधारित मोठा जनसमुदाय बेरोजगारीच्या खाईत लोटला गेला आहे. विजेची मागणी कमी झाल्याने शासकीय व खाजगी वीज केंद्रांमधून विज निर्मितीचे प्रमाणही कमी झाले. परिणामी वीज केंद्रांना लागणाऱ्या कोळश्याच्या मागणीतही घट झाली. लॉकडाऊन पूर्वी वणी रेल्वे साइडिंग वरून दिवसाला तीन रेल्वे रॅक लोड होऊन निघायच्या. लॉकडाऊन काळात याच रेल्वे साइडिंग वरून ८ ते १० दिवसांत एक रेल्वे रॅक लोड होऊन निघत आहे. वणी रेल्वे साइडिंग वरून कोरडी,पारस,परळी,चंद्रपूर,भुसावळ,नाशिक,एनटीपीसी मोहदा,रायपूर येथील शासकीय व खाजगी वीज केंद्रांना कोळसा पुरवला जातो परंतु बहुतांश वीज प्रकल्पांमध्ये वीज निर्मिती कमी झाल्याने पुरेसा कोळश्याचा साठा उपलब्ध असल्याने त्यांची कोळशाची मागणी कमी झाली आहे. आधी २५ हजार मेगावॅट लागणाऱ्या विजेची मागणी १२ हजार ५०० मेगावॅटवर आली आहे. एक वेळ अशी होती की ईण्डेन लागल्यानंतरही दोन तीन दिवस एम टी रॅक मिळत नव्हती. परंतु लॉकडाऊन काळात वणी रेल्वे ट्रॅकवर मागील एक ते दिड महिन्यांपासून रेल्वे रॅक उभी करून ठेवण्यात आली आहे. कोळसा भरण्याकरिता पॉईंटवर लागलेली रॅक पाच तासांमध्ये भरली गेली नाहीतर रॅक लोडींगचे कंत्राट असणाऱ्यांवर रेल्वे कडून ड्यामरेज लावल्या जायचा. आता तर ड्यामरेज तर दूरच रॅक लोड कारण्यापुरताही कोळसा कधी कधी उपलब्ध राहत नसल्याने रॅक तासानं तास उभी असते. कोळश्याची आवक घटल्याने खदानींमध्ये कोळशाचे उत्खननही कमी झाले आहे. त्यामुळे कोलट्रान्स्पोर्ट धारकांचे चांगलेच हाल झाले आहे. वेकोलिच्या जुनाड व घोन्सा या दोनच खदानींमधून साइडिंगवर कोळसा येत आहे. याठिकाणी बड्या ट्रान्सपोर्ट धारकांचेच ट्रक नाहींच्या बरोबर चालत आहेत. परंतु स्वतःचा व्यवसाय असावा या भावनेतून काही अनुभवी लोकांनी एकत्र येऊन घेतलेले ट्रक मात्र लॉकडाऊन काळापासून उभेच आहेत. एखाद्या मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीला संलग्न राहून ते आपले ट्रक चालवत असत. काही तर ड्रायव्हरकी करणाऱ्यांनीही हिम्मत करून या मोठ्या ट्रान्सपोर्ट धारकांच्या सांगण्यावरून ट्रक घेतले. कोळसा वाहतुकीच्या माध्यमातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असल्याने या व्यवसायाकडे लोकांचा कल वाढला होता. एखाद्या बड्या ट्रान्स्पोटरशी जुळून राहिल्याने नेहमी काम मिळत राहील या आशेने सामान्य वर्गांनिही ट्रांसपोटर कडून तथा त्यांच्या हिमतीवर थोडीफार लागत लावून फायनान्सवर ट्रक घेतले. परंतु आता आमच्याकडेच कामे नाही तर तुम्हाला कुठून कामे द्यायची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लोनवर ट्रक घेतले असल्याने मासिक किस्त भरण्याचे दडपण त्यांच्यावर असतेच त्यातल्यात्यात रोड टॅक्स, इन्शुरन्स, फिटनेस, यांची पूर्तता तर गाड्या चालो न चालो करावीच लागते. बडे ट्रांस्पोटर छोटे मोठे कंत्राट घेऊन गाड्या चालवून घेतात पण त्यांच्या भरोशावर ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांची पुरती वाट लागली आहे. ट्रान्सपोर्ट कंपन्यांजवळ कामे कमी असल्याने ते छोट्या वाहतूकदारांना पडल्या दरांमध्ये वाहने चालवण्यास सांगतात. त्यातून ड्रायव्हरचे पगार निघणेही कठीण असल्याने त्यांनी वाहने उभे ठेवणेच पसंद केले. सरकारने कोरोनामुळे उद्दभवलेल्या परिस्थिमुळे बंद असलेल्या उद्योगांना आर्थिक मदत मिळावी याकरिता खूप मोठे पॅकेज जाहीर केले आहे. छोटे वाहतूकदारही आर्थिक संकटात सापडले आहेत त्यांना आर्थिक साहाय्य मिळाले नाही तर स्वयंरोजगाराकडे वळणाऱ्यांची संख्या मंदावेल व बेरोजगारीचे संकट गडद होत जाईल. लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या किंवा मंदावलेल्या बहुतांश व्यावसायिकांनी आपापले रडगाणे गायले आहेत. परंतु छोट्या वाहतूकदारांनी आपले रडगाणे कुणाकडे गायचे हाच प्रश्न या कोलट्रान्स्पोर्ट व्यवसायाशी निगडित सर्वांनाच पडला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share