WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

थोरल्या भावाने केली धाकट्या भावाची कुऱ्हाडीने हत्या

Image

पालगाव बोटोणी येथील जागेचा क्षुल्लक वाद जीवावर बेतला

प्रतिनिधी/सचीन मेश्राम(मारेगाव-यवतमाळ)

मारेगाव दि.१जून -पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पालगाव बोटोणी येथे जागेच्या क्षुल्लक कारणावरून थोरल्या भावाने धाकट्या भावावर मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालीत हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. समाजमन सुन्न करणाऱ्या या हृदयद्रावक घटनेने सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याचा प्रत्यय आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पालगाव बोटोणी येथील मातृ पितृ छाया हरविलेले तीन मुले आहेत. यातील थोरला व धाकटा मुलगा घराशेजारीच वास्तव्याला आहे तर मधवा हा काही घराच्या अंतरावर वास्तव्य करीत आहे. मागील अनेक दिवसापासून थोरला भाऊ वसंता व धाकटा अशोक आत्राम यांच्यात गुरांच्या गोठा जागेवरून वादाची ठिणगी ही नित्याचीच बाब झाली होती. सोमवारला सकाळी वसंता यास गुरे जाण्यासाठी जागा मोकळी करण्याची सूचना करताच काही कळण्यापूर्वी अशोक च्या मानेवर वसंताने कुऱ्हाडीने वार केले. यात अशोक हा गंभीर अवस्थेत खाली निपचित पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अशोकच्या जमिनीवरील रक्तावर संशायित आरोपीने माती टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत गावातून पोबारा केला.

दरम्यान, निपचित गंभीर अवस्थेतील अशोकला पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशोकला मृत घोषित केले. परिणामी, संशायित आरोपीने गावातून पोबारा करीत पांढरकवडा गाठले. मारेगाव पोलिसांनी त्याला पांढरकवडा बस स्थानकावरून ताब्यात घेतले. सदर घटनेत सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याने क्षुल्लक वाद जीवावर उठला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .मृतकाच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share