WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या रेती तस्करांना अटक

Image

रेतीचा अवैध उपसा करून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केल्या जात असून तस्करीच्या आड येणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्या इतपत या तस्करांची मजल गेली आहे. अवैध रेती वाहून नेत असलेल्या ट्रकचा पाठलाग करणाऱ्या झरी येथील महसूल कर्मचाऱ्यांवर रेती तस्करांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना २२ डिसेंबर रोजी घडली. तेंव्हापासून फरार असलेल्या आरोपींना पाटण पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या उत्तम तपासाच्या आधारे आरोपींचे अटकपूर्व जमीन मिळविण्याचे प्रयत्न कुचकामी ठरले.

झरी तालुक्यात रेतीची तस्करी मोट्या प्रमाणात सुरु असून रेती तस्करांच्या दादागिऱ्याही चांगल्याच वाढल्या आहेत. अवैध रेतीच्या व्यवहारातून तगाडा मोबदला मिळत असल्याने या धंद्यात बरेच अपप्रवृत्तीचे लोकं उतरले आहेत. प्रशासनालाही न जुमानता अगदी निडर होऊन अवैध रेतीचा उपसा करून रेतीची परस्पर विल्हेवाट लावल्या जात आहे.अशीच अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने झरी तहसील कार्यालयाच्या महसूल कर्मचाऱ्यांनी अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला असता त्यांना रेती तस्करांनी माथार्जुन गावाजवळ अडवून मारहाण केली. मारहाण सुरु असतांना आरडाओरड केल्याने आरोपी तेथून पळाले. त्यामुळे कर्मचारी थोडक्यात बचावले. या घटनेपासून आरोपी फरारच होते. त्यांनी अटकपूर्व जमीन मिळविण्या करीता पुरेपूर प्रयत्न केले. परंतु पोलिसांनी केलेल्या उत्तम तपासामुळे त्यांची पांढरकवडा न्यायालय व नागपूर खंडपीठात जामीन नामंजूर करण्यात आली. त्यामुळे रेती तस्करी व कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या रवींद्र कायातवार व संदीप बेलखेडे रा. चिखलडोह या दोन्ही आरोपींना पाटण पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पाटणचे ठाणेदार बारापात्रे व पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांनी केली आहे. इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share