WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील त्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

Image

प्रशांत चंदनखेडे, वणी :-

अकोला जिल्ह्यातून परतलेल्या त्या संस्थात्मक कॉरंटाईन असलेल्या व्यक्तीचा थ्रोट स्वाब रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. संभाव्य लक्षणे आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीचे थ्रोट स्वाब यवतमाळ येथे तपासणी करीता पाठवण्यात आले होते. परजिल्हा व परप्रांतातून आलेल्या ज्या व्यक्तींना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे त्यांच्यावर प्रशासन अगदी बारीक लक्ष ठेऊन आहे. त्यांच्यापैकी कुणालाही संभाव्य लक्षणे आढळून आल्यास तातडीने त्यांना वैद्यकीय सेवा पुरवून त्यांची योग्य ती खबरदारी घेतल्या जात आहे.

विदर्भातील कोरोना संक्रमणाचे केंद्रबिंदू बनत चाललेल्या अकोला जिल्ह्यातून वणी परिसरात दाखल झालेल्या एका व्यक्तीला होम कॉरंटाईन करण्यात आले होते. कॉरंटाईनचा कालावधी पूर्ण होण्याआधी त्या व्यक्तीमध्ये ताप व खोकल्याची लक्षणे जाणवू लागल्याने त्याला १ जूनला पळसोनी कोविड सेंटर मध्ये कॉरंटाईन करून खबरदारी म्हणून त्याचे थ्रोट स्वाब यवतमाळ येथे तपासणी करीता पाठविण्यात आले. त्याचा अहवाल ५ जूनला सायंकाळी प्राप्त प्राप्त झाला असून त्या व्यक्तीची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे वणी प्रशासन व शहरातील जनतेने पुन्हा एकदा सुटकेचा श्वास घेतला आहे. याआधी उमरी (पेटूर) येथील दोन महिलांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांना पांढरकवडा आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आले होते. तेंव्हाही शहरवासीयांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला. कोरोना लॉकडाऊनमुळे परठिकाणी अडकलेल्या नागरिकांना स्वगावी जाण्याची परवानगी मिळाल्याने हजारो नागरिक आपापल्या गावी परतले. शहरात दाखल झालेल्या सर्वच नागरिकांची प्राथमिक तपासणी करून त्यांना होम कॉरंटाईन करण्यात आले. होम कॉरंटाईन असणाऱ्यांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असून त्यांना संभाव्य लक्षणे आढळल्यास त्वरित त्यांना आरोग्यसेवा पुरवून त्यांची योग्य ती खबरदारी घेतल्या जात असल्याने वणी शहर व तालुक्यातील नागरिक या महामारीपासून पूर्णतः सुरक्षित आहेत. तरीही नागरिकांनी स्वतःही खबरदारी घेऊन शासन प्रशासनाने सुचविलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share