WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

युवा मित्र मंचाच्या वतीने पार पडले सर्वात मोठे रक्तदान शिबिर

Image

रक्तदान शिबीरात २८७ च्या वर रक्तदात्यांनी केले रक्तदान, रक्तदात्यांमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती.

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी:कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात युवा मित्र मंचाच्या वतीने शहरातील धनोजे कुणबी मंगल कार्यालयात दिनांक ०७ जूनला रक्तदान शिबीर झाले. शिबिरात शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी यास विशेष सहकार्य केले. यावेळि युवा मंच च्या कार्यकर्ते व रक्तदाते यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , उविपोअ सुशील कुमार नायक, मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, संजय देरकर , नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे , पं.स.सभापती संजय पिंपळशेंडे, विजय पीदुरकर, राकेशभाऊ खुराणा, दिनकर पावडे, प्रमोद निकुरे. प्रा मालेकर सर, सुधाकर गोरे , रवीभाऊ बेलूरकर , गजानन विधाते, विवेक मांडवकर,जयसिंग गोहोकार, एकरे सर , डाँ.विलास बोबडे,अजय धोबे,सिद्दीकी रंगरेज, बंडूजी येसेकार, ड्रा सपाट, धनंजय त्रिम्बके, मंगेश रासेकर, ललित लांजेवार, ड्रा अमोल लोणारे, अनिल पावडे, उदयपाल महाराज, गोविंद थेरे, सचिन काळे,दत्ताभाऊ डोहे,मोहमद पटेल, धनराज भोंगळे,शरद इंगळे सर, बच्चेवार सर, किरणताई देरकर, तृप्ती ताई उंबरकर, साधना ताई गोहोकर, वंदनाताई आवारी , नीलिमाताई काळे, अल्काताई टेकाम, साधनाताई मत्ते, सपनाताई पावडे,

सोबतच अनेक महिला व मान्यवरांनी भेट दिली या शिबिरामध्ये चंद्रपूर येथील रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले . सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत २८७ च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

रक्तदान शिबीराच्या दिवशी झाली होती ४०० हुन अधिक नोंदनी

रक्तपेठी च्या अपुर्या रक्तसाठामुळे ३ तास शिबीर थांबले होते दुपारी ४ वाजता पुन्हा रक्तदान शिबीर चालू झाले रात्री उशीरापर्यंत जनतेच्या प्रतिसादामुळे रक्तदान शिबीर चालू होते.

दुपारी शिबीर थांबले नसते तर ४०० हुन अधिक रक्तदात्यानी रक्तदान केले असते

मुख्यतः रक्ताच्या साठ्यात घसरण झाल्याचे समोर आल्याने रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी अडचण निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांच्या सह अनेक संस्था व संघटनांनी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर राज्यात बऱ्याच ठिकाणी अनेक राजकीय व सामाजिक संघटना पुढे येऊन भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले. याच धर्तीवर येत्या ७ जूनला वणी शहरातील युवा मित्र मंचच्या वतीने शहरातील धनोजे कुणबी समाज भवनात सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. काही लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत अशा बिकट परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी भव्य रक्तदानाचे आयोजन करून रक्तदान माझ्या देशासाठी, करोनाशी लढण्यासाठी, जीवघेण्या आपत्तीसाठी व सामाजिक बांधिलकीसाठी या उदात्त हेतूने या मंचच्या वतीने हे रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संचारबंदी 144 कलम लागू आहे त्यामुळे रक्तदात्यांनी गर्दी न करता रक्तदान करून सहकार्य करायचे आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानासाठी विशेष सहकार्य चंद्रपूर येथील ब्लड बँकचे उपस्थिती होती.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिबिराला युवा मित्र मंचचे अध्यक्ष दिपक रासेकर ,शुभम पिंपळकर ,शुभम गोरे , गीतेश वैद्य ,अनिकेत चामाटे , शुभम इंगळे सुमंत बचेवार, शंकर देरकर,संदीप गोहोकर ,गौरव ताडकोंडावार ,अभिषेक येसेकर, प्रसाद मत्ते, साई नालमवार, आकाश बदकी, विशाल किन्हेकर ,स्वप्नील बोकडे ,सौरभ राजुरकर आदित्य लेडांगे, आकाश घोडे यासह असंख्य युवा मित्र परिवारानी अथक परिश्रम घेउन शिबिर यशस्वी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share