WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अवघ्या काही तासांतच चोरीच्या घटनेतील आरोपी अटकेत

Image

वणी पोलिसांची उत्तम कामगिरी

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-

वणी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत असलेल्या मुर्धोनी येथील शेतकऱ्याचे ३२ हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी घटनेचा छडा लाऊन दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील २८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. प्रशिल नामदेव पोटे या शेतकऱ्याने पैसे चोरीला गेल्याची तक्रार सोमवारला वणी पोलीस स्टेशनला नोंदवीली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी शीघ्र गतीने तपास करीत मुखभिरांकडून माहिती मिळवत अवघ्या काही तासांतच प्रकरणाचा छडा लाऊन महेश बबन गायकवाड (३२) रा. दामले फैल व नंदकिशोर काळे (२४) रा. शेतकरी भवन क्वाटर या दोन आरोपींना अटक केली. या कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पेरणीचा हंगाम सुरु झाल्याने खत बियाण्यांच्या खरेदीकरिता शेतकऱ्यांची तालुक्याच्या ठिकाणी सतत येणे जाने सुरु असते. लॉकडाऊनमुळे खात बियाणांचा निर्माण झालेला तुटवडा व प्रवाशी संख्येअभावी बसफेऱ्यांचे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे गावखेड्यातून खरेदी करिता येणाऱ्या शेतकरी व प्रवाश्यांना बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. अशाच एका बसच्या प्रतीक्षेत बसस्थानकावर बसून असलेल्या शेतकऱ्याचे ३२ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. शेतकऱ्याने पैसे चोरीला गेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनला दाखल करताच पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेत मुखभिरांकडून माहिती मिळवीत अवघ्या काही तासांतच चोरीशी संबंधित दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर महेश गायकवाड याच्याकडून १८ हजार रुपये व नंदकिशोर काळे याच्याकडून १० हजार रुपये अशी एकूण २८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या अतुलनीय कामगिरीबद्दल डीबी पथकाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात असून मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या प्रत्येक घटना अतिशय योग्यरीत्या पोलिसांनी हाताळल्या आहेत.चोरी, मारामारी, लुटपाट, तस्करी व एकमेकांवरील हल्ले या सर्व घटना अतिशय योग्यरीत्या व समयसुचकतापूर्वक हाताळल्याने कोणतेही अनर्थ घडले नाहीत. मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांवर पोलिसांची पकड मजबूत झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजूर व रोजंदार आधीच आर्थिक अडचणीत सापडला असतांना चोरटे त्यांच्यावर नजरा टिकउन त्यांच्या पैशावर डल्ला मारत आहे.परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे डाव उलटे पडत असून त्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्या जात असल्याने गुन्हेगारांत भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर भाद्वी च्या कलम ३७९,३४ नुसार गुन्हा नोदाविण्यात आला आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रस्वार, सुदर्शन वानोळे यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share