WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तरुणीला मारणं त्याला पडलं महागात, पोलिसांनी टाकलं सरळ त्याला तुरुंगात

ImageImageImageImageImageImageImage

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे वणी :- अल्पवयीन तरुणीच्या एकतर्फी प्रेमात पडून सतत तिच्याकडे लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाला तिचा नकार जिव्हाळी लागल्याने तिला भररस्त्यात मारहाण केल्याची घटना बुधवारी जटाशंकर चौक येथे घडली असून पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून कोणा येथील तरुणाला अटक केली आहे. गणेश कवडू उपरे (२२) रा. कोणा असें या विनयभंग प्रकरणात अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कोणा येथे वास्तव्यास असलेल्या या तरुणाचे सावरला येथील अल्पवयीन तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तरुणीशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत तो तिला वारंवार फोन करून लग्नाचा तकादा लावत होता. परंतु तिने वेळोवेळी नकार दिल्याने चिडलेल्या त्या तरुणाने तिला नातेवाईकांबरोबर बॅंकेत जात असतांना रस्त्यात गाठून मारहाण केली. भरचौकात झालेल्या मारहाणीने धास्तावलेल्या त्या तरुणीने ही बाब आपल्या आईवडिलांना सांगत सरळ पोलीस स्टेशन गाठून त्या तरुणाविरुद्ध मारहाणीची तक्रार नोंदविली. एकतर्फी प्रेमातून त्या तरुणाने तिला चांगलेच त्रस्त करुण सोडले होते. तिचा पाठलाग करणे , वारंवार फोन करून प्रेमाचे साकडे घालणे, लाग्नासाठीचा तगदा लावणे या त्याच्या मजनूगिरीने ती तरुणी चांगलीच वैतागली होती. त्याच्या त्या मदहौशी वागण्याकडे नेहमी दुर्लक्ष करीत तिने त्याचा प्रत्येक प्रस्ताव धुडकावून लावला. ओळखीचा फायदा घेऊन तिच्यावर स्वताचे प्रेम लादण्याचा केविलवाणा प्रयत्न त्याने चालवला होता. प्रेमात आंधळ्या झालेल्या त्या तरुणाने तिचा सततचा नकार जिव्हाळी लागल्याने तिला रस्त्यात अडवून मारहाण केली. अशाच एकतर्फी प्रेमप्रकरणातून कित्येक तरुणींवर जीवघेणे हल्ले झाले. तर कित्येक तरुणींना आपला जीवही गमवावा लागला. कधी शाळा कॉलेजांमधून, कधी गल्ली मोहल्यांमधून तर कधी नौकरी व्यावसायांमधून कित्येक तरुणींना या उपद्रवी तरुणांचा अनाहक छळ निमुटपणे सहन करावा लागतो. शाळा कॉलेजांमधील सुंदर, हुशार व श्रीमंत तरुणींना आपल्या प्रेमपाशात ओढण्याकरिता या टार्गट युवकांकडून विविध तऱ्हा अवलंबिल्या जातात. त्यांचा पाठलाग करणे, त्यांच्या मागावर असणे, त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, त्यांना प्रलोभने देणे असे विविध प्रकार अवलंबले जातात. या भूलपाथांना बळी पडून तरुणी त्यांच्या जाळ्यात अडकल्या जातात. ज्या तरुणी त्यांचे हे मनसुबे धुडकावून लावतात किंवा त्यांच्या उर्मट वागण्याकडे दुर्लक्ष करतात त्या तरुणींवर जबरीने प्रेम लादण्याचे प्रयत्न केले जातात. तरीही डाळ शिजत नसल्याचे पाहून या तरुणींवर हल्ले करण्या इतपत या प्रेमपिसाटांची मजल जात आहे. तरुण वयाची पायरी ओलांडताच काही तरुणांना प्रेमचं भूत पछाडतं. तरुन वयातील आकर्षणाने पछाडलेल्या या तरुणांची तरुणींच्या मागे लागून प्रेमवारी सुरु होते. टीव्ही मालिका व सिनेमातील नटांच्या प्रेमप्रकरनाचे अनुकरण करत एखादी तरुणी भाळली की तिच्यावर प्रेमाचे विविध पैथरे आजमावत तिला स्वताकडे आकर्षित करण्याकरिता कोणत्याही स्तराला जाणाऱ्या तरुणाईने गुन्हेगारी प्रवृतीकडे वाटचाल करीत तरुणींचे भविष्य व स्वताचे आयुष्य उधवस्त करण्यापलीकडे काहीही साध्य केले नाही. तरुणाई म्हणजे वादळी अशांततेचा काळ असतो. या काळात चुकीच्या मार्गावर जाण्यापासून स्वताला जपलं पाहिजे. स्वताच कर्तुत्व सिद्ध करण्याबरोबरच सक्षम आयुष्याची उभारणी करण्याच्या या काळात तरुण पिढी आकर्षित प्रेमाचे चाळे करीत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आंधळ्या प्रेमाच्या नादात स्वताबरोबरच शिक्षनात लीन असणाऱ्या तरुणींच्या आयुष्याचीही धूळधाण केल्या जात आहे. उच्च शिक्षित बनून स्वताचे व कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या तरुणींना या एकतर्फी प्रेमाने पिसाळलेल्या तरुणांच्या प्रेमलीलांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या जबरदस्ती प्रेम लादण्याच्या कृत्यांनी तरुणींमध्ये भीती निर्माण झाली आहे. जिल्हा, तालुका व गावखेड्यांमधेही एकतर्फी प्रेमप्रकरणे वाढीस लागली असून याचा विरोध करणाऱ्या तरुणींवर हल्ले होण्याच्या घटनाही वाढत आहे. अशाच एका एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीला मारहाण करणाऱ्या कोणा येथील गणेश कवडू उपरे या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर भाद्वी च्या कलम ३५४ (१), (२), ३२३ व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share